Mother Teresa : मदर तेरेसा यांनी चर्चची सर्वात वाईट बाजू लपवली, नवीन डॉक्यूमेंट्रीचा खळबळजनक दावा

तीन भागांची डॉक्यूमेंट्री मदर तेरेसा यांच्या काही जवळच्या मित्रांशी आणि त्यांच्या काही टीकाकारांविषयीही आहे. मदर तेरेसा यांचा जन्म 1910 मध्ये स्कोप्जे (आता उत्तर मॅसेडोनिया) येथे झाला. त्यांचे खरे नाव ऍग्नेस गोंजा बोयाजीजू होते, असेही सांगण्यात आले आहे.

Mother Teresa : मदर तेरेसा यांनी चर्चची सर्वात वाईट बाजू लपवली, नवीन डॉक्यूमेंट्रीचा खळबळजनक दावा
मदर तेरेसा यांनी चर्चची सर्वात वाईट बाजू लपवली, नवीन डॉक्यूमेंट्रीचा दावा
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 5:45 PM

मुंबई : शांततेचे नोबेल पारितोषिक ( Nobel Peace Prize) मिळालेल्या मदर तेरेसा (Mother Teresa) यांच्याबद्दल एका नव्या डॉक्यूमेंट्रीत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘मदर तेरेसा: फॉर द लव्ह ऑफ गॉड’ (Mother Teresa For the Love of God) नावाच्या या डॉक्यूमेंट्रीत त्यांनी कॅथोलिक चर्चच्या सर्वात वाईट अतिरेकांचा पर्दाफाश केला असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच डॉक्युमेंट्रीचा दावा आहे की त्या युद्ध थांबवू शकल्या, राष्ट्रपतींशी मैत्री केली, जागतिक स्तरावर अनाथाश्रमांचे एक विशाल नेटवर्क तयार केले आणि आजारी कैद्यांना तुरुंगातून मुक्त केले. पण, मदर तेरेसा यांनी कॅथोलिक चर्चच्या वाईट कृत्यांवर पांघरूण घातले. लोकांना गरिबी आणि दुःखातून बाहेर पडण्यास मदत करण्याऐवजी त्यांनी त्यांचे लक्ष या गोष्टींकडे जास्त वेधल्याचे सांगण्यात आले आहे. तीन भागांची डॉक्यूमेंट्री मदर तेरेसा यांच्या काही जवळच्या मित्रांशी आणि त्यांच्या काही टीकाकारांविषयीही आहे. मदर तेरेसा यांचा जन्म 1910 मध्ये स्कोप्जे (आता उत्तर मॅसेडोनिया) येथे झाला. त्यांचे खरे नाव ऍग्नेस गोंजा बोयाजीजू होते, असेही सांगण्यात आले आहे.

येशू ख्रिस्त बोलल्याचा दावा

त्या फक्त आठ वर्षांच्या होत्या जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाला अत्यंत गरिबीचा सामना करावा लागला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी चर्चमध्ये आश्रय घेतला. आणि वयाच्या 18 व्या वर्षी ती कॅथोलिक सिस्टर्स ऑफ द लॉरेटो ऑर्डरमध्ये सामील होण्यासाठी डब्लिनला गेल्या आणि एका वर्षानंतर शिक्षिका होण्यासाठी कलकत्ता (आता कोलकाता) येथे गेली. 1943 मध्ये बंगालच्या दुष्काळात लोकांच्या मृत्यूचा आणि त्रासाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यानंतर तीन वर्षांनंतर त्यांनी असा दावा केला की येशू ख्रिस्त माझ्याशी ट्रेनमध्ये बोलला, असाही दावा या डॉक्यूमेंट्रीत करण्यात आला आहे.

जॅक प्रागर काय म्हणाल्याचा दावा?

ब्रिटीश डॉक्टर जॅक प्रागर यांनी त्यांच्यासोबत चॅरिटी सुरू केल्यापासून अनेक वादविवाद झाल्याचे या डॉक्यूमेंट्रीत दाखवण्यात आले आहे. प्रागर यांनी जे पाहिले ते पाहून त्याला आश्चर्य वाटले, असेही या डॉक्यूमेंट्रीत सागण्यात आले आहे. ते म्हणतात, त्या रुग्णांची योग्य काळजी घेत नव्हत्या. एकच सिरिंज अनेक वेळा वापरली जात होती आणि त्याचे निर्जंतुकीकरणही होत नव्हते. एका भाजलेल्या महिलेला औषधे नाकारण्यात आली, मी तिला गुप्तपणे काही औषधे दिली. असा दावाही प्रागर यांनी केल्याचे सांगण्यात आले आहेत. तसेच जॅक प्रागर म्हणाले, ‘गरिबांसाठी चांगले हॉस्पिटल चालवण्यासाठी त्याच्याकडे पैसे होते, पण तसे त्यांनी कधीच केले नाही. कोणताही उपचार न करता आम्ही दुःखाचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू, असे त्या म्हणाल्या, असेही सागण्यात आले आहे, असे अनेक खळबळजनक दावे या डॉक्यूमेंट्रीत करण्यात आल्याने आता ही डॉक्यूमेंट्री चर्चेत आली आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.