माझे वडील पळाले नाहीत, तेव्हा आम्ही… झाकीर नाईक याच्या मुलाने काय केला दावा
साल 2016 मध्ये भारतातून पसार झालेला इस्लामिक प्रवचनकार झाकीर नाईक आणि त्याचा मुलगा अचानक पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानने दोघांना 5 ऑक्टोबरला त्यांच्या देशात आमंत्रित केले असल्याने या प्रकरणाला पुन्हा उजळणी मिळाली आहे.झाकीरवर कट्टरतेचे धडे दिल्याचा तसेत peace टीव्हीतून आगलाऊ वक्तव्य केल्याचा आरोप आहे
भारतात मनी लॉण्ड्रीग, दहशतवाद पसरविणे अशा अनेक आरोपाखाली वॉण्टेड असलेला इस्मामिक उपदेशक झाकीर नाईक आणि त्याचा मुलगा शेख फारीक नाईक यांना पाकिस्तानने निमंत्रण दिले आहे. भारतातून पसार झाल्यानंतर मलेशियात आश्रय घेतलेल्या झाकीर नाईक याच्या मुलाने माझे वडील भारतातून पळाले नाहीत असा दावा केला आहे. तसेच अनेक मुद्दयांवर त्याने एका युट्युब चॅनलवर आपली मते मांडली आहेत.
पाकिस्तानी युट्युबर नादीर अली याच्या शोमध्ये फारीक नाईक याने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहे. आपल्या वडीलांनी कुठल्या परिस्थितीत भारत सोडला याचाही खुलासा त्याने केला आहे. फारीक म्हणाला जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा आम्ही भारतात नव्हतो. आम्ही तेव्हा ईद निमित्त मक्केत गेलो होतो. जर आम्ही भारतात असतो तर आम्ही पळून गेलो असे म्हटले असते तरी चालले असते असाही दावा त्याने केला.
नाईक साल 2016 मध्ये अचानक चर्चेत आला. तेव्हा बांग्लादेशाची राजधानी ढाका येथे बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यातील आरोपीने आपण झाकीर नाईक याचे प्रवचन ऐकून हा ब्लास्ट घडविल्याची कबूली दिली तेव्हा झाकीर नाईक वादात सापडला. त्यानंतर भारतीय यंत्रणांचा ससेमिरा चुकविण्यासाठी झाकीर भारताबाहेर पसार झाला होता. झाकीर याच्या मुलाचे म्हणणे आहे की बॉम्बस्फोटाशी माझ्या वडीलांचे काही घेणे देणे नाही.ब्लास्टचा आरोपी सोशल मिडीयावर माझ्या वडीलांना फॉलो करीत होता. त्यामुळे माझ्या वडीलांना दोषी ठरविल्याचे फारीक नाईक याने सांगितले. वाद सुरु झाल्यानंतर माझे वडील भारतात येणार होते. परंतू मिडीयाने हे प्रकरण इतके तापविले की माझ्या वडीलांना विचार बदलावा लागला. माझ्या वडीलांवर लावलेला एक आरोप सिद्ध झाला नाही.
भारताची आठवण येते
माझे वडील झुम मिटींग पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार होते. ते खटल्याला ऑनलाईन सामोरे जाण्यास तयार होते. परंतू तेथील तपास यंत्रणांनी नकार दिला. भारत आणि इतर देशात आरोपींना त्यांची बाजू मांडू न देता तुरुंगात सडवले जाते. नंतर दहा ते पंधरा वर्षांनी निर्दोष सोडले जाते. त्यामुळे आम्ही मलेशियात राहणे पसंत केले. माझा जन्म भारतातला आहे त्यामुळे मला भारताची आठवण खूप येते. परंतू मलेशिया मुस्लीम देश आहे. आम्ही रहातो तेथे सर्व मोहोल इस्मामिक असल्याचे त्याने म्हटले आहे.
महिला अधिक धर्मांतर करतात
धर्मांतराविषयी देखील त्याने मत मांडले आहे. अमेरिकेत 9/11 नंतर मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुरुषांपेक्षा महिला अधिक इस्लाम धर्म स्वीकारत असतात. कारण इस्लाममध्ये महिलांना खूपच इज्जत मिळते. पाश्चिमात्यांनी ज्याप्रकारे महिलांनी मानहानी केली आहे ती पाहन महिला इस्लाम कबुल करीत असल्याचे फारीक नाईक याने सांगितले. पाश्चिमात्य देशात इस्माम धर्म स्वीकारण्यात दोन तृतीयांश या महिला असल्याचे त्याने सांगितले. माझे वडील ऑनलाईन धार्मिक उपदेश करतात. त्यांनी हिंसा करण्यासाठी चिथावणी दिल्याचे एकही वाक्य दाखवा असे आवाहन फारीक नाईक यांनी केले आहे. माझे वडीलांचे व्याख्यान ऐकून अनेक लोक इस्लाम कबूल करतात. त्यांना आम्ही संस्थेत सामील होण्यास सांगत होतो. आता भारतातून बाहेर गेल्यानंतर जगभरातील चाहत्यांना तेथील स्थानिक मुस्लीम संस्थांशी संपर्क करण्यास वडील सांगत असतात असेही फारीक नाईक याने सांगितले. आपण मात्र दोन ते तीन जणांना इस्लाम कबूल करण्यास प्रेरित केले असल्याचेही त्याने सांगितले.