ना तो फार बोलतो, ना शिकण्यात तेज होता, आता थेट म्यानमारमध्ये तख्तापलट करणाऱ्या जनरलची संपूर्ण कहाणी
म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर सर्वांची नजर ही सेना प्रमुख सिनीअर जनरल मिन आंग लाईंगवर आहे. सत्तापालटनंतर त्यांच्या हातात सत्तेची सूत्र आहेत.
नवी दिल्ली : म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर सर्वांची नजर ही सेना प्रमुख सिनीअर जनरल मिन आंग लाईंगवर (Burmese Army General Min Aung Hlaing) आहे. सत्तापालटनंतर त्यांच्या हातात सत्तेची सूत्र आहेत. म्यानमारच्या सेनेने याबाबत जाहीर केलं (Burmese Army General Min Aung Hlaing).
म्यानमारच्या राजकारणात सेनेचं वर्चस्व नेहमी कायम होतं. 1962 मध्ये सत्तापालट झाल्यानंतर सेनाने देशावर जवळपास 50 वर्ष शासन केलं. त्यानंतर 2008 मध्ये इथे संविधान आणण्यात आलं. यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना जागा देण्यात आली. पण, सेनेची स्वायत्तता आणि वर्चस्व कायम ठेवण्यात आलं. म्यानमारमध्ये लोकशाही सरकार कुठला कायदा आणू शकते पण तो लागू करायचा की नाही याचा निर्णय सेना घेते.
संविधानाने दिलेल्या अधिकारावरुन म्यानमारच्या सेनेने सोमवारी आंग सान सूसह अनेक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अटक करुन सत्तापालट केलं. सत्तापालट करणारे जनरल मिन आंग लाईंग हे 64 वर्षांचे आहेत. लाईंग यांनी 1972-74 पर्यंत यंगून विद्यापिठात कायद्याचं शिक्षण घेतलं. रॉयटर्सला दिलेल्या एका मुलाखतीत लाईंग यांच्या मित्राने सांगितले की, ते खूप कमी बोलायचे आणि अगदी लो प्रोफाईल राहायचे. 1974 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात लाईंग यांनी डिफेंस अकादमीत प्रवेश मिळवला. ते धिम्या गतीने पण सतत प्रगती करत होते, असं त्यांचे साथीदार सांगतात. एक मिडल क्लास रँकिंग ते म्यानमारचे सेना प्रमुख बनण्याच्या त्यांच्या प्रवासावर त्यांचे साथीदारही आश्चर्य व्यक्त करतात (Burmese Army General Min Aung Hlaing).
30 मार्च 2011 ला मिन आंग लाईंग हे सेना प्रमुख झाले. यादरम्यान ते लोकशाहीच्या मार्गावर पुढे चालत गेले. मिन आंग लाईंग यांनी सेनेत आल्यानंतर जास्तकरुन म्यानमारच्या पूर्वी सीमेवर बंडखोराविरोधात लढण्यात गेला. 2009 मध्ये मिन आंग लाईंग म्यानमार-चीन सीमेवर कोकांग विशेष क्षेत्रात सशस्त्र गटांविरोधात ऑपरेशन चालवलं. एका आठवड्याच्या आत या ऑपरेशनला यशस्वीपणे पार पाडलं. 2016 मध्ये जेव्हा आंग सान सू यांचा पहिला कार्यकाळ सुरु झाला तेव्हा आंग लाईंग यांनी मौन पाळलं. 2015 च्या निवडणुकांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मिन आंग लाईंग यांनी म्यानमारच्या राजकारणात सेनेची सक्रिय भूमिकेची बाजू मांडली होती.
आंग लाईंग यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये आपला कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली लोकप्रयता वाढवली. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. पण, 2017 मध्ये रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्यांकांविरोधातील त्यांच्या कारवाईमुळे त्यांचं खातं बॅन करण्यात आलं. लाईंग यांच्या नेतृत्त्वात झालेल्या सैन्याच्या अभियानामुळे जवळपास सात लाख रोहिंग्या मुसलमान शेजारी देश बांग्लादेशात पलायन करण्यास भाग पाडले. संयुक्त राष्ट्राने केलेल्या अध्ययनानुसार, म्यानमारच्या सेनेने नरसंहारच्या उद्देशाने आपलं ऑपरेशन राबवलं. यादरम्यान, त्यांनी सामूहित हत्या आणि सामूहिक बलात्कार केले. अमेरिकेने याविरोधात 2019 मध्ये मिन आंग लाईंग आणि सेनेच्या तीन इतर नेत्यांवर प्रतिबंध लावले. त्याशिवाय, ब्रिटननेही यावर प्रतिबंध घातले. मिन आंग लाईंगविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरु आहे.
म्यानमारमध्ये लष्कराचा उठाव, सत्तापालट; वर्षभरासाठी आणीबाणीhttps://t.co/8Su74fCVqU#SuuKyi | #Myanmar | #Myanmarcoup
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2021
Burmese Army General Min Aung Hlaing
संबंधित बातम्या :
‘या’ भीतीमुळे ब्रिटीनच्या राणीकडून 50 वर्षांपूर्वी ‘Royal Family’वरील माहितीपट बॅन, आता लिक…
पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट