पाण्याने भरलेला रहस्यमय ग्रह!, नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपचा नवा आविष्कार, वैज्ञानिक हैराण
नासा संशोधकांच्या मते, जीजे १२१४ बी मध्ये बाष्पाने बनलेले वातावरण आहे. नासा संशोधकांचे म्हणणे आहे की, हा ग्रह पाण्याने भरलेला आहे.
नवी दिल्ली : खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी सुमारे ४० प्रकाशवर्ष दूर एका ताऱ्याच्या चारही बाजूला फिरणारा ग्रह जीजे १२१४ बी बाबत नवीन संशोधन केले आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने मिनी नेप्च्युनच्या नावाने असलेल्या ग्रहाला जवळून पाहता आले. मिनी नेप्च्युन विशाल गॅसीय ग्रहाचा एक भाग आहे. आपल्या सौरमंडलामध्ये असा कोणताही ग्रह नाही. यामुळे वैज्ञानिकांना याबाबत जिज्ञासा आहे. परंतु, आता याचे काही रहस्य समोर येत आहेत.
सुरुवातीला या ग्रहाला पाहिले तेव्हा ढगांसारखा दिसत होता. त्यामुळे तो व्यवस्थित पाहत येत नव्हता. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आतापर्यंतचा सर्वात मोठा शक्तीशाली टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोपने ढगांचा अभ्यास केला. याचे रिझल्ट १० मे च्या जर्नल नेचरमध्ये पब्लिश केले गेले. नासा संशोधकांच्या मते, जीजे १२१४ बी मध्ये बाष्पाने बनलेले वातावरण आहे. नासा संशोधकांचे म्हणणे आहे की, हा ग्रह पाण्याने भरलेला आहे.
जेम्स वेबने शोधली खास माहिती
नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबचा संशोधक रॉब जेलेमने म्हटले की, गेल्या एका दशकापासून या ग्रहाबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार, ढगांनी भरलेला असा हा ग्रह आहे. मिड इंफ्रारेड इंस्ट्रूमेंटचा वापर ग्रहाचे तापमान मोजण्यासाठी करण्यात आले. या भागात फिरत असताना दिवस आणि रात्र दोन्हीचे तापमान मोजण्यात आले. यामुळे हा ग्रह कशापासून बनलेला आहे, याची माहिती झाली.
तापमानात झाला बदल
जीजे १२१४ बी च्या तापमानात मोठा बदल झाला. दिवसा तापमान ५३५ डिग्री फॅरनाईट आणि रात्री १०० डिग्री फॅरनाईटपर्यंत असते. तापमानाता चढाव-उतार राहते. वातावरणात फक्त हायट्रोजनचेचं अणू नाहीत. या ग्रहावर पाणी किंवा मिथेन असावे, असा संशोधकांचे अंदाज आहे.