BRICS: पंतप्रधान नरेंद्र मोदी- शी जिनपिंग आमने-सामने येणार, गलवानमधील झटापटीनंतर तणाव वाढला
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ब्रिक्सच्या बैठकीत आमने सामने येणार आहेत. Narendra Modi and XI Jinping will be face to face in BRICS summit
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ब्रिक्सच्या बैठकीत आमने सामने येणार आहेत. भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दुसऱ्यांदा दोन्ही देशांचे प्रमुख एकत्र येणार आहेत. ब्रिक्स देशांची परिषद ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. ब्रिक्स समूहातील दोन्ही प्रमुख देशांमध्ये गेल्या काही महिन्यापासून तणावाचे वातावरण वाढले आहे. (Narendra Modi and XI Jinping will be face to face in BRICS summit)
नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग शांघाय सहयोग संघटन परिषदेत आमने सामने आले होते. मात्र, त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग यांच्यासोबत कसल्याही प्रकारची चर्चा केली नव्हती. ब्रिक्समध्ये जगातील पाच प्रमुख देशांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाच मोठ्या अर्थव्यवस्था य माध्यमातून एकत्र येत असतात.
ब्रिक्स समूह म्हणजे काय?
ब्रिक्स (BRICS) हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समूह आहे. 2010 पर्यंत यामध्ये चार देश होते. मात्र, चीनच्या प्रस्तावानंतर दक्षिण आफ्रिकेचा यामध्ये समावेश करण्यात आला. ब्रिक्स देशांची पहिली परिषद 16 जून 2009 रोजी झाली होती. या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह तर चीनचे तत्कालीन राष्ट्रपती हू जिंताओ यांनी केले होते.
ब्रिक्स परिषद
दक्षिण आफ्रिका 2011 मध्ये पहिल्यांदा ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यंदाच्या शिखर परिषदेचे आयोजन रशियातर्फे करण्यात येणार आहे. भारत 2021 मधील शिखर परिषदेचे आयोजन करेल.
शिखर परिषदांचे आयोजन आणि वर्ष
भारत 2012, 2016 चीन 2011, 2017 ब्राझील 2014, 2019, दक्षिण आफ्रिका 2013, 2018 रशिया : 2009,2015, 2020
ब्रिक्स समुहाची वैशिष्ट्ये
ब्रिक्स समुहाचे मुख्य कार्यालय शांघाईमध्ये आहे. 2014 मध्ये ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक आणि कॉन्टिजेंट रिजर्व अरेंजमेंट अशा दोन वित्तीय संस्थांची निर्मिती करण्यात आली. ब्रिक्समधील दक्षिण आफ्रिका सोडल्यास इतर देश लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये आहेत.
ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा विरोध, व्यापार, आरोग्य, उर्जा, कोरोनाचा प्रभाव या विषयांवर चर्चा होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख नेते सहभागी होतील.
संबंधित बातम्या :
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जानेवारीपर्यंत कार्यभार, अमेरिका-चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता
भारत-चीन तणाव कायम, वाद निवळण्यासाठी 6 नोव्हेंबरला आठवी बैठक
(Narendra Modi and XI Jinping will be face to face in BRICS summit)