नासाची चांद्र मोहिम पुन्हा रखडली; लाँचिंगच्या मार्गात दुसऱ्यांदा आले ‘हे’ विघ्न

रॉकेटमध्ये इंधन वितरण प्रणालीमध्ये त्रुटी निर्माण झाली होती. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे.

नासाची चांद्र मोहिम पुन्हा रखडली; लाँचिंगच्या मार्गात दुसऱ्यांदा आले 'हे' विघ्न
नासाची चांद्र मोहिम पुन्हा रखडलीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 11:35 PM

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ (NASA)ला आपल्या चंद्र मोहिमे (Lunar Mission)त पुन्हा झटका बसला आहे. नासाला ‘आर्टेमिस-1‘चे प्रक्षेपण पुन्हा पुढे ढकलावे लागले आहे. मोहिमेतील रॉकेट (Rocket) आज रात्री 11.47 वाजता उड्डाण घेणार होते. मात्र त्याआधीच तांत्रिक बिघाडाचे विघ्न उभे ठाकले आणि नासाला रॉकेटचे प्रक्षेपण पुन्हा थांबवावे लागले. रॉकेटमध्ये इंधन वितरण प्रणालीमध्ये त्रुटी निर्माण झाली होती. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. नवीन लॉन्चची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

अवघ्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा प्रक्षेपण रोखले

‘आर्टेमिस-1’च्या प्रक्षेपणाबाबत नासा प्रचंड आशावादी आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत दोनदा रॉकेटचे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे थांबवावे लागले आहे. हा नासासाठी मोठा झटका मानला जात आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी रॉकेटच्या चार इंजिनांपैकी तिसऱ्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तसेच खराब हवामानामुळे रॉकेटचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते.

आर्टेमिस-1 मून मिशन म्हणजे काय?

अमेरिका 53 वर्षांनंतर आर्टेमिस चांद्र मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे. आर्टेमिस-1 हे या दिशेने पहिले पाऊल आहे. हे प्रमुख मोहिमेसाठी एक चाचणी उड्डाण असेल, ज्याद्वारे कोणताही अंतराळवीर पाठवणार नाही. या उड्डाणाद्वारे शास्त्रज्ञांनी चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे शोधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच चंद्रावर गेल्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतील का, याचीही चाचपणी केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

नासाची ‘स्पेस लॉन्च सिस्टम (एसएलएस) मेगारॉकेट’ आणि ‘ओरियन क्रू कॅप्सूल’ चंद्रावर पोहोचतील. अंतराळवीर सहसा क्रू कॅप्सूलमध्ये राहतात. परंतु यावेळी ते रिक्त असेल. हे मिशन 42 दिवस 3 तास 20 मिनिटांचे आहे. त्यानंतर ते रॉकेट पृथ्वीवर परत येईल. रॉकेट एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

नासाच्या मानवी चांद्र मोहिमेची अनेक दशके रखडपट्टी

एसएलएस रॉकेटची योजना 2010 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आली होती. त्यांना ‘नक्षत्र कार्यक्रमा’द्वारे अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे होते, परंतु मोहिमेत अनेक विलंब झाल्यानंतर सरकारने मोहिम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अमेरिकन संसदेचे इतर हेतू होते. त्या अनुषंगाने संसदेने नासा अधिकृतता कायदा, 2010 मंजूर केला. त्याअंतर्गत नासाला एसएलएस रॉकेट आणि ओरियन क्रू कॅप्सूलचे नियोजन सुरू ठेवण्यास सांगितले गेले. (NASA lunar mission has been postponed again due to a technical issue)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.