नासाच्या मंगळयानासमोर मोठे संकट! मंगळावरील वादळात टिकू शकेल का Perseverance Rover?
लाल ग्रहावर म्हणजेच मंगळावर वारंवार वादळ येत असतात. तिथे विजेचा कडकडाट देखील जोरदार होतो. सोसाट्याचे वारे वाहतात. या वाऱ्यांचा वेग इतका असतो की, मंगळावरील मोठेमोठे दगड देखील विस्कळीत होतात.
मुंबई : लाल ग्रहावर म्हणजेच मंगळावर वारंवार वादळ येत असतात. तिथे विजेचा कडकडाट देखील जोरदार होतो. सोसाट्याचे वारे वाहतात. या वाऱ्यांचा वेग इतका असतो की, मंगळावरील मोठेमोठे दगड देखील विस्कळीत होतात. मंगळ ग्रहावर पुन्हा एकदा असेच धुळीचे वादळ येणार आहे. या वादळात जोरदार वीजा चमकू लागतील. मंगळ ग्रहावरील या धुळीच्या वादळामुळे, जांभळ्या रंगाचे वातावरण तयार होईल. या सगळ्यात नासाचे ‘मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हर’ (NASA Mars Perseverance Rover ) हे यान या वादळापासून वाचेल का? किंवा हे दूरवरून त्या वादळाची सुंदर छायाचित्रे घेईल आणि पृथ्वीवर पाठवेल?, असे ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत (NASA Mars Perseverance Rover may face dust storm on mars).
ओरेगॉन युनिव्हर्सिटीचे भूगर्भशास्त्रज्ञ जोशुआ मेंडेज हार्पर यांनी सांगितले की, मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हर ज्या जाजेरो क्रेटरमध्ये आहे, तिथे काही दिवसांपूर्वी देखील एक वादळ आले होते. आता पुढचे वादळ येईपर्यंत रोव्हरला कोणताही धोका नाही. परंतु, जेव्हा हे वादळ येईल तेव्हा मंगळ ग्रहाचा रंग बदलून जांभळा जाईल. रोव्हरच्या समोर, बर्याच वेळा वीजा चमकताना दिसू शकतील.
NASAचा हेतू सध्या होईल!
जोशुआ यांनी सांगितले की, हे लवकरच घडेल. म्हणूनच नासाने ज्या उद्देशाने मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरला मंगळावर पाठवले आहे, तो हेतूदेखील पूर्ण होईल. म्हणजेच आपल्याला मंगळावर वाढणारी वादळं, वीज, धूळ, इलेक्ट्रिक चार्ज इत्यादींचा अभ्यास करण्यास मिळेल.
मंगळाचा रंग बदलणार!
मंगळ ग्रह यावेळी जांभळ्या रंगाचा कसा होणार हा प्रश्न देखील आहे. तर, जेव्हा धुळीचे वादळ येते तेव्हा घर्षणामुळे धुळी कण विद्युत चार्ज होतात. जेव्हा, असे चार्ज केलेले कण एकमेकांना भिडतात, तेव्हा ते वेगवेगळ्या रंगांचे वातावरण तयार करतात. यावेळी छोट्या-छोट्या वीजा देखील तयार होतात. ही वीज नुकसान होण्यास इतकी मजबूत नसते, परंतु एकाच वेळी बऱ्याच विजा येऊ शकतात. हे दृश्य बहुधा ज्वालामुखी फुटल्यानंतर जसे दिसते, तसेच असेल (NASA Mars Perseverance Rover may face dust storm on mars).
पर्सिव्हरेन्सला जैविक घटक शोधण्याची संधी
जोशुआ म्हणाले की, मंगळावरील या वादळाचे परीक्षण करतांना मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरला मंगळावर जैविक घटक शोधण्याची संधी मिळेल. जर तो यशस्वी झाला, तर हा सर्वात मोठा शोध असेल. कारण, जेव्हा असे वादळ येते, तेव्हा ते आपल्याबरोबर निरनिराळ्या वस्तू घेऊन येते. अशा अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आहेत, ज्या मंगळावर प्राचीनकाळात जीवन अस्तित्त्वात असल्याचा पुरावा देऊ शकतात.
LIVE? Take a close look at my new home. Members of my team are giving you a tour around the high-def 360-degree panorama I sent back. They’re zooming in on the details of the Martian terrain I’m in and are answering your questions live. #CountdownToMarshttps://t.co/9tpv4Vl4lV
— NASA’s Perseverance Mars Rover (@NASAPersevere) February 25, 2021
(NASA Mars Perseverance Rover may face dust storm on mars)
ट्रिबॉइलेक्ट्रिक चार्जिंग म्हणजे काय?
मंगळावर धुळी वादळामुळे निर्माण होणार्या विजेला ‘ट्रिबॉइलेक्ट्रिक चार्जिंग’ म्हणतात. जेव्हा आपण हिवाळ्यामध्ये धातूच्या खुर्चीला स्पर्श करता, तेव्हा आपल्याला थोडासा धक्का बसतो किंवा जर एखाद्याने एखाद्याला स्पर्श केला, तर त्याला धक्का बसतो, हे देखील तसेच आहे. मंगळावरील धुळीच्या वादळादरम्यान असेच छोटे विजेचे शॉक तयार होतात. मंगळावर वारंवार ट्रिबॉइलेक्ट्रिक चार्जिंग होत असते.
मंगळावर ट्रायबॉइलेक्ट्रिक चार्ज होण्यामागचे कारण म्हणजे त्याचे सौम्य वातावरण. मंगळाच्या वातावरणापेक्षा पृथ्वीचे वातावरण बरेच वजनदार आहे. त्यामुळे तिथे असे चार्ज तयार होत नाहीत. जोशुआ मेंडांझ म्हणतात की, अशा स्पार्कमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. नासाकडून मंगळाविषयी अधिक माहिती गोळा करण्याची ही संधी आहे.
(NASA Mars Perseverance Rover may face dust storm on mars)
हेही वाचा :
मंगळावरुन पृथ्वी कशी दिसते पाहिलात का? जगातला सर्वात वेगानं शेअर केला जाणारा फोटो पहा