NASA | नासाने मान्य केलं की पृथ्वीबाहेरही वेगळे जीव आहेत, UFO संदर्भात 33 पानांच्या अहवालात धक्कादायक दावे

मेक्सिकोच्या संसदेने एलीयनचे एक हजार वर्षे जुने अवशेष सादर केल्यानंतर नासाने आपल्या 33 पानांच्या अहवालात परग्रहवासियांबद्दल अनेक धक्कादायक दावे केलेत...

NASA | नासाने मान्य केलं की पृथ्वीबाहेरही वेगळे जीव आहेत, UFO संदर्भात 33 पानांच्या अहवालात धक्कादायक दावे
LOGO_NASAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 10:12 PM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : मेक्सिकोच्या संसदेने एलियन म्हणजे परग्रहवासियांच्या तब्बल एक हजार वर्षे पुरातन ममी मिडीयासमोर सादर केल्याने खळबळ सुरु केली आहे. त्यामुळे पृथ्वी शिवाय अन्यत्र आपल्यापेक्षा प्रगत संस्कृती आहे का ? याविषयी पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे. जर परग्रहवासीय अस्तित्वात आहेत तर ते आपल्याशी संपर्क का करीत नाहीत ? त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला अजून पत्ता कसा लागत नाही अशा चर्चा गेली अनेक वर्षे सुरु आहेत. नासाने तर अथांग पसरलेल्या विश्वात आपल्यासारखे कोणी सजीव आहेत का याच्या शोधासाठी वॉयजर-1 आणि वॉयजर-2 ही याने पाठविली आहेत. त्यातच आता नासाने युएफओवर आपला 33 पानी अहवाल सादर केला आहे.

परग्रहांवर कुठे आपल्यासारखी किंवा आपल्याहून अत्यंत प्रगत मानव आहेत का ? याची मानवाला पहिल्या पासून उत्सुकता आहे. परंतू या संदर्भात अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपट येऊन गेले आहेत. युएफओ आकाशात पाहिल्याच्या अनेक घटना परदेशात छातीठोकपणे सांगितल्या जात असतात. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा गुरुवारी युएफओवर आधारित आपला बहुप्रतिक्षित रिपोर्ट सादर केला आहे. नासाने या अहवालावर एक वर्षे अभ्यास केल्यानंतर तो सादर केला आहे. ज्यामुळे जगाचे याकडे लक्ष लागले आहे. या 33 पानाच्या अहवालात नासाने म्हटले आहे की या विषयाचा अधिक विस्तृत अभ्यासासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सॅटलाईट्सची गरज आहे. नासाने हे मान्य केले की युएफओ आपल्या ग्रहावरील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. हा अहवाल सादर करीत नासाचे प्रबंधक बिल नेल्सन यांनी म्हटले की या ब्रह्मांडात पृथ्वी शिवाय देखील वेगळे जीवन आहे.

लोकांचा रस वाढणार

नासाने म्हटले आहे की आम्ही नव्या योजनेत ग्रह आणि तेथील वातावरण आणि एलियन यांच्या शोधासाठी देखील प्रयत्न करीत आहोत. युएफओच्या संशोधनासाठी नवीन संचालकाची घोषणा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. मेक्सिकोच्या संसदेत कालच एलियनचे दोन जतन केलेले मृतदेह सादर करण्यात आले आहेत. या मृतदेहांच्या हातांना तीन बोटं आहेत. एलियन्सचे मृतदेह युएफओ तज्ज्ञ जॅमी मौसान यांनी प्रथमच जगासमोर आणले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात एलियन आणि युएफओच्या संदर्भात लोकांचा रस पुन्हा वाढ शकतो असे म्हटले जात आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.