सुनीता विल्यम्स यांचे अचानक वजन कमी, कारण जाणून घ्या…

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा स्टारलाईनरमधील तांत्रिक अडचणींमुळे अंतराळत मुक्काम वाढविण्यात आला. पण, आता एक नवं संकट समोर आलं आहे. सुनीता विल्यम्स यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील वास्तव्यादरम्यान झपाट्याने वजन कमी होतं आहे. ‘नासा’चे डॉक्टर चिंतेत पडले आहेत. या रिपोर्टमध्ये तुम्हाला कळेल की, त्यांचे वजन का कमी होत आहे. -

सुनीता विल्यम्स यांचे अचानक वजन कमी, कारण जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 7:03 PM

सुनीता विल्यम्स यांचं वजन कमी होतं आहे. यामुळे ‘नासा’ची चिंता वाढली आहे. जूनमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर परतल्यापासून त्यांच्या शरीराचे वजन कमी होत आहे. यामुळे डॉक्टरांसाठी देखील हा चिंतेचा विषय बनला आहे. अमेरिकन न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नासा’चे तज्ज्ञ सुनीता यांचे वजन सामान्य पातळीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

अंतराळवीरांचा मुक्काम का वाढला?

विल्यम्स आणि त्यांचा जोडीदार बॅरी विल्मोर यांना यावर्षी 5 जून रोजी बोईंग स्टारलाईनरमधून अंतराळात पाठवण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची मोहीम केवळ आठ दिवसांची होती, परंतु स्टारलाईनरमधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा अंतराळ मुक्काम वाढविण्यात आला.

आरोग्यावर विपरीत परिणाम

अंतराळात बराच वेळ अडकून राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांची अंतराळ मोहीम आता आठ महिन्यांची असून फेब्रुवारी 2025 पर्यंतच पृथ्वीवर परत येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता ‘नासा’ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्याकडे पूर्ण लक्ष देत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध झालेल्या एका फोटोमध्ये सुनीता विल्यम्स यांचा दुबळा फॉर्म पाहून तज्ज्ञ त्यांच्या तब्येतीबाबत विशेष सावध झाले आहेत. ‘नासा’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुनीता यांचे वजन खूप कमी झाले आहे आणि आता त्या खूप पातळ दिसत आहे. या स्थितीत आपले वजन नॉर्मल करण्याला प्राधान्य असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

सुनीता विल्यम्स यांचे अंतराळात वजन घटलेले आहे त्याची प्रचिती देणारा हा फोटो –

अंतराळात वजन कमी होण्याची कारणं कोणती?

अंतराळात वजन कमी होणे ही एक सामान्य बाब आहे. विशेषत: जास्त कालावधीच्या मोहिमांमध्ये हे होतं. अंतराळवीरांना पृथ्वीवर राहणाऱ्यांपेक्षा जास्त कॅलरीजची गरज असते. मोहिमेच्या सुरुवातीला सुनीता विल्यम्स यांचे वजन 63.5 किलो होते आणि उंची 5 फूट 8 इंच होती. पण त्यांना मिळणारा हाय कॅलरीयुक्त आहारही त्यांच्या गरजा भागवू शकला नाही.

रोज 3500 ते 4000 कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत

मानवी शरीराचे चयापचय वेगवान होते. यामुळे त्यांना अधिक कॅलरीची आवश्यकता असते. ‘नासा’च्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सामान्य अंतराळवीराने आपले वजन स्थिर ठेवण्यासाठी रोज 3500 ते 4000 कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत.

दोन तासांचा व्यायामही आवश्यक

शून्य गुरुत्वाकर्षणात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज सुमारे दोन तासांचा व्यायामही आवश्यक आहे. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होते.

सुनीता विल्यम्ससाठी खास व्यवस्था

‘नासा’च्या डॉक्टरांनी सुनीता यांच्या प्रकृतीकडे महिनाभरापूर्वीच लक्ष देण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून प्रकृती सुधारण्यासाठी प्रभावी पावले उचलता येतील. आपल्या शरीराची उर्जेची गरज भागविण्यासाठी आणि वजन संतुलित ठेवण्यासाठी सुनीता यांना रोज 5000 कॅलरी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.