नसरल्लाहचा खात्मा 5th जनरेशन F-35 जेटने केला, मग भारत का खरेदी करतोय राफेल?, अमेरिकेचे षडयंत्र ?

सध्याचा जमाना स्टील्थ फायटरचा जेटचा आहे. जगातील सर्व सुपर पॉवर देशांनी अशा प्रकारचे स्टील्थ फायटर जेट तयार केलेले आहेत. त्याच्या ताकदीचा प्रत्यय इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याने सर्वांना आला आहे. भारताला देखील अशाच स्टील्थ फायटर जेटची आवश्यकता आहे.

नसरल्लाहचा खात्मा 5th जनरेशन F-35 जेटने केला, मग भारत का खरेदी करतोय राफेल?, अमेरिकेचे षडयंत्र ?
F-35 VS RAFALE
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 5:16 PM

लेबनॉनमध्ये हेजबोल्लाचा प्रमुख हसन नरसल्लाह ( Hasan Nasrullah ) याचा खात्मा अमेरिकेच्या  पाचव्या पिढीच्या F-35 जेटने केला आहे. या फायटर जेटने 80 टन बॉम्बचा वर्षाव केल्याने बंकरमध्ये अंडरग्राऊंड लपून बसलेला नसरल्लाह आणि त्याचे अनेक कमांडो ठार झाले. नसरल्लाह जमीनीच्या खाली सुमारे 60 फूट आतमध्ये बंकरमध्ये लपून बसला होता. परंतू अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या एफ-35 जेटने इतके भीषण बॉम्ब डागले की संपूर्ण परिसर बेचिराख आणि उद्धवस्थ झाल्याने कोणीच वाचले नाही. भारताला पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही बाजूंनी धोका असताना भारत अजूनही चौथ्या पिढीच्या आणि 4.5 व्या पिढीच्या जेट विमानांवरच का विसंबून आहे असा सवाल संरक्षण तज्ज्ञ करीत आहेत.

भारताने अलिकडेच फ्रान्सकडून 36 राफेल लढावू विमाने घेतली आहे. भारतीय वायू सेनेकडे रशियाचे सुखोई 30 एमकेआय देखील आहे. हे भारताच्या ताफ्यातील प्रमुख फायटर विमाने आहेत. परंतू दोन्ही विमाने चार ते साडे चार जनरेशनची आहे. भारत अजून आपल्या नौदलासाठी फ्रान्सच्या राफेल खरेदीचा सौदा करण्यात बिझी आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपल्या पायलटना चीनची FC-31 स्टील्थ फायटर विमानांचे ट्रेनिंग देण्यासाठी पाठवत आहे. पाकिस्तान चीनकडून पाचव्या पीढीचे एफसी-31 जेट फायटर खरेदी करणार आहे.

भारताकडे काय पर्याय ?

भारताला देखील हे फायटर जेट आपल्याकडे असणे गरजेचे आहे असे वाटत नाही असे अजिबात नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेच्या स्थायी समितीने देखील पाचव्या पिढीचे फायटर जेट खरेदी करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. भारत देखील 5च्या पिढीचे फायटर जेट बनविण्याच्या मागे लागला आहे. परंतू हा प्रकल्प आधी ठरलेल्या काळानुसार सुरु नसून खूपच मागे पडला आहे. या प्रोजेक्टचे नाव AMCA असे आहे. अशात भारताकडे आता एकच पर्याय शिल्लक राहीला आहे. त्याला अमेरिका किंवा अन्य देशाकडून पाचव्या पिढीचे जेट फायटर विकत घ्यावे लागणार आहे.

अमेरिका आणि रशिया हे दोन पर्याय –

अत्याधुनिक फायटर जेट विमानांसाठी आता भारताकडे दोनच देश आहेत. एक म्हणजे रशिया किंवा अमेरिका हे ते दोन देश आहेत. भारक रशियाकडून एंटी मिसाईल सिस्टीम एस-400 प्रणाली खरेदी करणार आहे. अशावेळी रशियाच्या पाचव्या पिढीचे सुखोई-57 फेलॉन लढाऊ विमान देखील भारताला फायद्याचे ठरु शकते. परंतू भारतीय लष्कर या रशियन जेटच्या परफॉर्मेन्सने संतुष्ठ नाही. त्यांना अमेरिकेच्या F-35 फायटरमध्ये जास्त रस आहे. रशियाबरोबर लष्करी साहित्य खरेदीच्या करारामुळे हे घडणे कठीण झाले आहे.

एफ -35 साठी भारताकडे आता सध्याच्या S-400 सिस्टमला निष्क्रिय करणे आणि हळूहळू अमेरिकेची पॅट्रीयट मिसाईल सिस्टीममध्ये ती परिवर्तित करणे हाच पर्याय आहे. यामुळे अमेरिकेची चिंता दूर होईल आणि भारताला एफ -35 फायटर देणे अमेरिकेला शक्य होईल.परंतू असे होणे कठीण आहे. काही तज्ज्ञांच्या मते भारत एक मोठा देश आहे. भारताने आपल्या संवेदनशील सीमा क्षेत्रात जेथे S-400 सिस्टम तैनात केलेली आहे.त्याच्याहून दूर F-35 लाही तैनात करू शकतो. परंतू सध्या तरी जोपर्यंत आपण रशियाची S-400 सिस्टमला निष्क्रिय करीत नाहीत तोपर्यंत तरी अमेरिका भारताला F-35 विमाने देणार नाही.

रशियन सुखोई 57 चांगला पर्याय

रशियाच्या सुखोई-57 प्रोजेक्टमध्ये भारत देखील सहभागीदार होता. परंतू इंजिनची ताकद आणि स्टील्थ क्षमता पाहून समाधान न झाल्या या प्रकल्पातून भारत बाहेर पडला. Su-57 ला अद्ययावत करुन यात खास इंजिन लावण्याचा दावा रशिया करीत आहे. पाचव्या पिढीच्या Su-57 युक्रेन बरोबरच्या युद्धात उतरलेले असल्याचा रशियाचा दावा आहे. परंतू तरीही यावर संशय आहे. याच दरम्यान मध्य पूर्वेत इस्रायलने एफ-35 च्या ताकदीचा नमूना पेश केला आहे. सध्या केवळ एफ-35लाच युद्धाचा अनुभव आहे.

मोठा कठीण निर्णय

भारतासाठी Su-57 किंवा F-35 यापैकी एकाची निवड करण्याचा कठीण फैसला करावा लागणार आहे. अमेरिका जरी भारताला F-35 देण्यासाठी जरी राजी झाला असता तरी त्याचे सुटे भाग, शस्रास्रे, आणि देखभालीसाठी संपूर्णपणे नवीन पुरवठा प्रणाली राबवावी लागणार आहे. जी खूपच महागडा सौदा ठरु शकते. ही सर्व उपकरणे अमेरिकेतून आयात करावी लागतील. तसेच यात एक भीती देखील आहे ती म्हणजे भारतावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका पुढे जाऊन हा पुरवठा रोखण्याची धमकी देखील देऊ शकतो. अशात स्टील्थ फायटर विमाने मिळविणे भारतातसाठी आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे भारत राफेलची नवीन कुमक आणि सुखोई -30 ला अपग्रेड करण्याच्या निर्णयावर फोकस करीत आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.