नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलक रस्त्यांवर, राजकीय पक्षांविरोधात संताप
नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )
काठमांडू: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये आणखी एक वादळ उठलं आहे. नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. आंदोलकांनी नेपाळमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांवर रोष व्यक्त केला आहे. हिंदू राष्ट्र घोषित करुन नेपाळमध्ये राजेशाही लागू करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )
नेपाळच्या नागरिकांनी देशातील राजकीय नेते, पक्ष त्यांची जबाबदारी विसरले, असल्याचा आरोप केला आहे. राजेशाही व्यवस्था लागू करण्याची मागणी नेपाळच्या विश्व हिंदू महासंघ, शैव सेना नेपाल, राष्ट्रीय सरोकार मंच, गोरक्षनाथ नेपाळ या संघटनांनी केली आहे. प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांनी नेपाळमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय शक्ती नेपाळचे अध्यक्ष केशव बहादूर बिस्टा यांनी हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. बिस्टा यांनी तीन मागण्या केल्या आहेत. नेपाळमध्ये संविधानिक राज्यपद्धती जाहीर करावी. नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करावे, देशातील संघीय राज्यपद्धती संपवण्यात यावी, अशीही मागणी केशव बहादूर बिस्टा यांनी केली. सध्याचे के.पी. शर्मा ओली यांचे सरकारने सामान्य जनतेला संकटात ढकले आहे, असा आरोप बिस्टा यांनी केला.(Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )
2008 मध्ये राजेशाहीचा शेवट
नेपाळनं 2008 मध्ये 240 वर्ष जूनी राजेशाही पद्धत रद्द करुन लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली होती. 2015 मध्ये नेपाळमध्ये नवे संविधान बनवण्यात आले. त्यानंतर देशाला लोकशाही संघराज्य प्रजासत्ताक देश घोषित केले गेले. संविधानानुसार 2017 मध्ये नेपाळमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये नेपाळमधील मार्क्सवादी पक्ष सत्तेत आला. प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये पृथ्वी नारायण शाह यांचे पोस्टर हाती घेतले होते. पृथ्वी नारायण शाह 18 व्या शतकातील आधुनिक नेपाळचे संस्थापक होते. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )
12 वर्षात 11 पंतप्रधान
पृथ्वी नारायण शाह यांनी 1765 मध्ये नेपाळच्या एकत्रीकरणाची मोहिम हाती घेतली होती. 1768 मध्ये गोरखा राजानं किंग्डम ऑफ नेपाळची स्थापना केली. त्यानंतर शाह वंशातील पाचवा राजा राजेंद्र विक्रम शाह याच्या कार्यकाळात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीनं नेपाळच्या सींमावरील काही भागांवर कब्जा केला. यादरम्यान राजांमधील गटबाजी वाढली आणि यामुळे देशात लोकशाही व्यवस्था लागू करण्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. नेपाळमध्ये 2008 साली 240 वर्षांची राजेशाही संपून लोकशाही राज्य पद्धती सुरु झाली. यानंतर दोन वेळा नेपाळचं संविधान बदलण्यात आलं. नेपाळमध्ये पंतप्रधानांचा कार्यकाळ फारच कमी राहिल्याचे दिसून आले आहे. लोकशाही देश झाल्यानंतर नेपाळ मध्ये 12 वर्षात 11 पंतप्रधान झाले आहेत. (Nepal citizens protest for demanding nation as Hindu rashtra )
संबंधित बातम्या:
‘रॉ’चे प्रमुख नेपाळमध्ये; देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधानांशी दोन तास गुप्त चर्चा
नेपाळ वठणीवर, संरक्षण मंत्र्यांना हटवलं, लष्करप्रमुख नरवणेंच्या दौऱ्यापूर्वी हालचाली