कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

New Strain of Coronavirus in UK : कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 12:58 PM

लंडन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. असे असताना ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती (New Coronavirus Strain) आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसची नवी प्रजाती ब्रिटनमध्ये आढळली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर (Out Of Control) जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे. (new coronavirus strain found in Britain)

तर, ब्रिटनमधील कोरोनास्थिती लक्षात घेता जगातील अनेक देशांनी खबरदारी घेणे सुरु केले आहे. अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमानं रद्द केली आहेत. या नव्या कोरोना व्हायरसमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सोमवारी आपत्कालीन  बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या नव्या प्रजातीविषयी चर्चा होणार आहे.

नवा कोरोना व्हायरस किती घातक?

कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. ‘नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,” असे लॅलेगर यांनी सांगितलं.

वैज्ञानिकांसमोर दोन प्रश्न

कोरोना व्हायरसची नवी प्रजाती समोर आल्यानंतर वैज्ञानिकांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. तो किती प्रमाणात संसर्ग पसरवू शकेल?, तो किती घातक आहे?, या प्रश्नांची उत्तर शोधण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. मात्र, मुख्यत्वे ज्या भागात कोरोनाची नवी प्रजाती आढळलेली आहे, त्या भागात कोरोना संसर्ग वाढण्याचे नेमके कारण काय? तसेच, नव्या प्रजातीमध्ये कशा प्रकारे म्युटेशन्स होत आहेत?, या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आव्हान सध्या वैज्ञानिकांसमोर आहेत.

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी

दरम्यान, कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढल्यामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. युरोपमधील बहुतांश देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच, जर्मनीसुद्धा ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. नेदरलँडने  डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रिटनमधील विमानाला देशात उतरण्यास बंदी असल्याचे जाही केले आहे.

ऑस्ट्रिया, इटलकडूनही खबरदारीचा उपाय

ऑस्ट्रिया आणि इटली या देशांकडूनही खबरदरी घेण्यात येत आहे. ब्रिटनहून येणारे विमान देशात उतरण्यावर बंदी घालण्याचा विचार या देशांकडून सुरु आहे. इटलीचे परराष्ट्रमंत्री लुइगी डी मायो यांनी आवश्यक ते उपाय करण्याची गरज व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

ज्याला मेसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार, टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मेड इन इंडिया, नो साईड इफेक्ट, Covaxin रामबाण ठरणार?

इस्रायलमध्ये 27 डिसेंबरपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात, दिवसाला 60 हजार नागरिकांचे लसीकरण

(new coronavirus strain found in Britain)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.