आता रेल्वेचं तिकिट बुक करणं आणखी सोपं, IRCTC कडून नवं फिचर लाँच

भारतीय रेल्वेने (Indian Railways) नुकतीच आपली वेबसाईट www.irctc.co.in अपडेट केली आहे. याशिवाय रेल्वेने मोबईलवरुन रेल्वे तिकिट बुकिंग करण्यासाठी वापरलं जाणारं रेल कनेक्ट मोबाईल अ‍ॅपही अपग्रेड केलंय.

आता रेल्वेचं तिकिट बुक करणं आणखी सोपं, IRCTC कडून नवं फिचर लाँच
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 4:21 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) नुकतीच आपली वेबसाईट www.irctc.co.in अपडेट केली आहे. याशिवाय रेल्वेने मोबईलवरुन रेल्वे तिकिट बुकिंग करण्यासाठी वापरलं जाणारं रेल कनेक्ट मोबाईल अ‍ॅपही अपग्रेड केलंय. त्यामुळे रेल्वे तिकिट बुकिंग अधिक सोपं झालं आहे. या अद्ययावतीकरणामुळे IRCTC वेबसाईटवरील आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेवरील ई-तिकिटचा पर्याय अधिक वेगवान आणि सोपा झाला आहे. प्रवाशांना इतर विविध ऑनलाईन तिकिटिंग आणि वेबसाईट पेक्षा अधिक चांगली सुविधा मिळावी हाच रेल्वे विभागाचा उद्देश आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी आयआरसीटीसीची अपडेटेड वेबसाईट लाँच केली होती (New Features in Railway ticket booking IRCTC website and App upgraded).

सध्या IRCTC वेबसाईटचे 6 कोटीपेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. याचा उपयोग करुन दररोज 8 लाखापेक्षा अधिक तिकिट बुक केले जातात. एकूण आरक्षित रेल्वे तिकिटांपैकी जवळपास 83 टक्के तिकिटं ऑनलाईन माध्यमातून बुक केले जातात.

अपडेटेड IRCTC वेबसाईटचे खास फिचर्स

  • आता एकाचवेळी 5 लाख यूजर्स IRCTC वेबसाईटवर लॉगिन करु शकतात. आधी ही मर्यादा 40,000 होती.
  • यूजर्स पर्सनलायझेशन फिचर प्रवाशांच्या लॉगिनला जोडलेलं आहे. त्यामुळे प्रवशांना तिकिट बुक करतानाच जेवण, रुम आणि हॉटेल बुक करण्याचीही सुविधा मिळणार आहे. प्रवाशांना आपल्या सर्व गरजांसाठी एकाच ठिकाणी सर्व पर्याय उपलब्ध होतील.
  • यूजर अकाउंट्स पेजवर रिफंडची स्थिती तपासणं अधिक सोपं.
  • ‘Regular’ किंवा ’Favorite’ प्रवास करताना त्यासाठीची माहिती आता स्वयंचलित पद्धतीने भरली जाईल आणि बुकिंग अधिक सोपं होईल.
  • विविध स्टेशनची माहिती शोधण्यातील अडथळे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे तिकिट बुकिंग करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करण्यात आलाय.
  • वेबसाईट लोड होण्यात वेळ लागू नये म्हणून बॅकएन्डला एक ‘Cache system’ सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा :

भारतीय रेल्वेची खास ‘लाईफलाईन एक्सप्रेस’, प्रत्येक भारतीयाचा अभिमान!

Indian Railway | पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेचे खास ‘व्हिस्टाडोम कोच’, पाहा याची वैशिष्ट्ये…

नव्या वर्षात गोवा-मसुरी फिरायला जायचा विचार करताय? मग रेल्वेची ‘ही’ खास योजना वाचा…

New Features in Railway ticket booking IRCTC website and App upgraded

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.