हट्टी किंवा नापसंत सहकारी, अगदी बॉसलाही 5 हजार ते 9 लाख रुपयांत विकणारे आले ‘मोबाईल ॲप’
उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा व्यवसाय खूप महत्त्वाचा असतो. मात्र, कामाच्या दबावामुळे अनेकजण मानसिक तणावात जातात. दिवसभराची धांदल आणि ऑफिसमध्ये चांगले वातावरण नसल्यामुळे अनेक वेळा लोक नैराश्यग्रस्त होतात. या समस्येवर मात करण्यासाठी एक मनोरंजक ऑनलाइन प्लॅटफॉर्म शोधण्यात आला आहे.
दक्षिण कोरियामध्ये कामाच्या ताणामुळे एका रोबोटने आत्महत्या केल्याची अनपेक्षित घटना अलीकडेच समोर आली आहे. ही घटना खूप धक्कादायक होती. हा रोबोट असला तरी अनेक व्यक्तींना या रोजच्या तणावाला सामोरे जावे लागते. उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा व्यवसाय खूप महत्त्वाचा असतो. परंतु, कामाच्या दबावामुळे अनेकजण मानसिक तणावात जातात. दिवसभराची धांदल आणि ऑफिसमध्ये चांगले वातावरण नाही. त्यामुळे अनेक वेळा लोक नैराश्यग्रस्त होतात. या समस्येवर मात करण्यासाठी एक मनोरंजक ऑनलाइन प्लॅटफॉर्म शोधण्यात आला आहे. ज्याद्वारे नोकरदार त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या हट्टी अथवा नापसंत सहकाऱ्यांना नाममात्र किमतीमध्ये विकू शकतात.
नोकरदार व्यक्तींच्या या समस्येवर मात करण्यासाठी चीनमध्ये हे मोबाइल ॲप लाँच करण्यात आले आहे. या मोबाईल ॲपवरून नोकरदार लोक त्यांचे बॉस, त्यांचे नापसंद सहकारी किंवा अगदी ते करत असलेली नोकरीही विकू शकतात. इतकेच नाही तर व्यक्तीला दिलेल्या कामावर ते खुश नसतील तर त्यासाठीची किंमतही ते लावू शकतात.
चीनमधील नोकरदार लोकांनी स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी त्यांची निराशा नाहीशी करण्यासाठी हा नवा मार्ग शोधला आहे. अलीबाबाच्या सेकंड हँड ई कॉमर्स मोबाइल ॲप जियान्यु हे ते मोबाईल ॲप आहे. याच मोबाईल ॲपवर नोकरदार आपले बॉस, सहकारी यांना विकत आहेत. सामान्य सहकाऱ्याची किंमत 5 ते 10 हजार रुपये तर बॉसची किंमत 9 लक्षपर्यंत ठेवण्यात आली आहे. असे केल्याने या नोकरदार वर्गाचे मन हलके होऊन त्यांना बरे वाटते, असा दावा करण्यात येत आहे.
दिवसभराच्या कामानंतर मानसिक आणि शारीरिक थकवा घालवण्यासाठी हे ॲप लोकांची पहिली पसंती बनत आहे. एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ‘त्याने आपल्या नेहमी मस्करी करणाऱ्या आणि मत्सरी सहकाऱ्याला 3 हजार 999 युआन ( 45 हजार 925 रुपये) मध्ये विकले. त्याची इतकी किंमत ठेवून मी माझ्या सहकाऱ्याचा बदला घेतला. या मोबाईल ॲपवर प्रत्यक्षात कुणी कुणालाही विकत नाही. मात्र, बॉस किंवा सहकारी याला विकून ते आपल्या मनात असलेला राग, चिडचिड व्यक्त करतात. हे केवळ मनोरंजनासाठी ॲप बनविण्यात आले आहे. मनातील राग बाहेर काढण्यासाठी या ॲपला लोकांनी पहिली पसंती दिली आहे. आणखी एका वापरकर्त्याने असे म्हटले की, ‘त्याने त्याच्या ‘बिन डोक’ मॅनेजरला अवघ्या 5,000 रुपयांना विकले होते. तो अनेकदा टीका करतो. कितीही चांगले काम केले तरी त्याची प्रशंसाही करत नाही. त्यामुळे त्यांची किंमत इतकी कमी ठेवून त्याला त्याची लायकी दाखवून दिली.’