Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर ‘या’ देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?

फक्त ब्रिटनच नाही तर इतरही देशात कोरोनाची नवी प्रजाती आढळल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (new strain corona virus)

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर 'या' देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?
corona virus maharashtra
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 9:35 PM

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती (New Strain of Coronavirus) आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. या नव्या प्रजातीमुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनतर आता फक्त ब्रिटनच नाही तर इतरही देशात कोरोनाची ही नवी प्रजाती आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मध्यंतरी कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेल्या देशांमध्ये कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (new strain of corona virus found in different states)

कोरोनाची नवी प्रजाती आढळ्यामुळे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, इटली, डेनमार्क या देशांनी चिंता व्यक्त केली आहे. तर युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनमधील विमानांना बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये आढळलेली कोरोनाची नवी प्रजाती पहिल्या प्रजातीपेक्षा अधिक वेगाने संसर्ग पसरवत आहे. हा संसर्ग 70 टक्के अधिक आहे. अशाच प्रकारच्या घटना ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, इटली, डेनमार्क या देशांतून समोर आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य अधिकारी आणि विषाणूच्या हालचालीवर नजर ठेवणाऱ्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची नवी स्ट्रेन 501.V2 नावाने ओळखली जात आहे.

कोणकोणत्या देशांत आढळला नवा कोरोना

कोरोनाची ही नवी प्रजाती अनेक देशांमध्ये आढळून आली आहे. स्वीडनमधील वैज्ञानिकांना कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन एप्रिल महिन्यामध्येच आढळला होता. या वैज्ञानिकांनी नव्या व्हायरसवर अभ्यास करून काही माहिती जमा केली होती. त्यानुसार या नव्या व्हायरसमध्ये दोन प्रकारचे जनेटिक मटेरियल आहे. ज्यामुळे नव्या कोरोना व्हायरसचा प्रसार अधिक गतीने होत आहे. इंग्लड येथील केंब्रिज विद्यापीठातील व्हायरोलॉजिस्ट रवी गुप्ता यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे. नव्या कोरोना व्हायरसचे जगभरात एकूण 6000 रुग्ण सापडले आहेत. तसेच, यापैकी सर्वात जास्त रुग्ण हे डेन्मार्क आणि इंग्लड येथे आढळल्याचे त्यांनी सांगितले.

इटली, फ्रान्समध्येही कोरोनाची नवी प्रजाती

इटली आणि फ्रान्समध्येदेखील कोरोनाची नवी प्रजाती आढळली आहे. ही प्रजाती ब्रिटनमध्ये आढळलेल्या प्रजातीसारखीच आहे. ब्रिटनमधून इटलीमध्ये आलेल्या एका नागरिकामध्ये नव्या कोरोनाचा विषाणू आढळल्याचे इटलीने रविवारीच सांगितले आहे. तर, ब्रिटनमध्ये आढळलेल्या प्रजातीचा संसर्ग फ्रान्समध्येही झाल्याचा संशय फ्रान्सने व्यक्त केला आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार तसे ठोस पुरावे अद्याप आढळेलेले नाहीत.

भारतालाही धोका?

दरम्यान, कोरोनाच्या या नव्या प्रजातीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक देशांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्रान्समधील विमानांना उतरण्यास मनाई केली आहे. भारतालाही या नव्या कोरोनाचा धोका असल्यामुळे भारत सरकारनेही कार्यवाही करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सोमावारी आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन बैठक बोलवून प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा केली. त्यानंतर ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानांना 31 डिसेंबरपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. सोमवारी रात्री 12 वाजेपासून हा नियम लागू होईल.

संबंधित बातम्या :

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, सरकार सतर्क, घाबरु नका

भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

(new strain of corona virus found in different states)

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.