जगातील आधुनिक शहर इंच इंचाने समुद्रात गडप होत आहे, NASA ने केले वेळीच सावधान
मानवाने विकासाच्या हव्यासापोटी गगनचुंबी इमारती आणि कॉंक्रीटीकरण केल्याने जगातील हे सुंदर शहर हळूहळू समुद्राच्या पोटात बुडत चालल्याचे नासाने म्हटले आहे.
नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : जगातील सर्व देश विकासाच्या शर्यतीत एकमेकांना मागे टाकेत पुढे चालले आहेत. अनेक शहरांनी विकासाच्या शर्यतीत अनेक देशांना मागे टाकले आहे. अनेक देशांनी इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत की त्यामुळे या देशांना आदर्श जीवनशैलीसाठी ओळखले जात आहे. परंतू या विकासाच्या शर्यतीत अनेकदा निसर्गाच्या मर्यादांचे उल्लंघन होत आहे. जितक्या वेगाने विकास होत आहे तितक्याच वेगाने निसर्गाचा समतोल ढळत आहे. त्यामुळे विकासाची फळे खाताना पुढे अंध:कार पसरला आहे. नासाच्या ( NASA ) संशोधकांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
नासाच्या वैज्ञानिकांनी जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क ( New York ) बाबत धक्कादायक विधान केले आहे. समुद्र किनारी असलेले हे सुंदर चमचमते शहर समुद्राच्या आत हळूहळू चालले असल्याचे नासाने म्हटले आहे. संशोधकांनी म्हटले आहे इंच दर इंच हे शहर समुद्रात शिरत आहे. ही प्रक्रीया दरवर्षी 1.6 मिलीमीटर वेगाने होत आहे हे पाहता येऊ शकते असे नासाने म्हटले आहे. त्यामुळे ही चिंतादायक स्थिती आहे. परंतू असे का होत आहे. कसे काय न्यूयॉर्क या अडचणीत सापडले ?
नासाने सांगितले कारण
नासाने न्यूयॉर्क शहराबाबत सावधान केले आहे. हे शहर समुद्रात जाण्याचा वेग धोकादायकरित्या जादा आहे. न्यूयॉर्कचा विकास वेगाने झाला आहे. येथे अनेक गगनचुंबी इमारती आणि कॉंक्रीट इन्फास्ट्रक्चरचे वजन जास्त वाढले आहे. त्यामुळे हे शहर जमिनीत शिरत चालले आहे. हा अभ्यास साऊथ कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि न्यूजर्सीच्या रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकाच्या एका ग्रुपने सायन्स एडव्हान्सेसमध्ये प्रकाशित केले आहे.
समुद्रात जात आहे हा भाग
संशोधकांनी काही अशा क्षेत्रांना शोधून काढले आहे जे 1.6 मिलीमीटर दराने वेगाने समुद्रात सामावले जात आहे. या क्षेत्रात लागार्डीया एअरपोर्ट, आर्थर ऐश स्टेडीयम आणि कोनी बेटाचा समावेश आहे. न्यूयॉर्क शहर ग्लेशियरवर उभे आहे. ज्या ग्लेशियरवर ते उभे आहे तो आक्रसत चालला आहे. त्यामुळे भूस्खलनासारख्या घटना वाढल्या आहेत. आर्थर ऐश स्टेडीयम आणि लागार्डीया रनवे या ग्लेशियरच्या आक्रसल्यामुळे दरवर्षी 4.5 ते 3.7 मिलीमीटर दराने समुद्रात शिरत चालले आहेत. या संपूर्ण शहरात शेकडो गगनचुंबी इमारती आहेत. या इमारतींचे वजन जादा आहे. त्याचा भार जमिनीला झेलावा लागत आहे.