जगात नव्या झोम्बी आजाराची सुरुवात झाल्याने खळबळ, मानवजातीला धोका ?
झोंबी नावाचे अनेक चित्रपट आपण पाहीले किंवा ऐकून तरी असाल. मध्यंतरी झोंबिवली नावाचा मराठी सिनेमा आला होता. परंतू हे चित्रपट भयपट म्हणून आले होते. आता अमेरिकेतील काही प्रांतात झोंबी नावाच्या नव्या आजाराची सुरुवात झाली आहे. हा आजार साथीचा असून मलमुत्र आणि लाळेतून पसरु शकतो असे म्हटले जात आहे. त्यामुळे जगात चिंता व्यक्त होत आहे.
न्यूयॉर्क | 21 फेब्रुवारी 2024 : कोरोना काळानंतर नवनवीन विषाणूंचा प्रादुर्भावानं मानव जातीला चिंताग्रस्त केले आहे. आता एका नव्या झोंबी नावाच्या आजाराची सुरुवात झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील हरिणांना झोंबी नावाचा आजार झाल्याचे निदान करण्यात आले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेले हरिण चित्रविचित्र वागतात. या आजाराने त्यांच्या मेंदूत छींद्र पडतात असे उघडकीस आले आहे. अमेरिकेत गेल्या दोन महिन्यात सुमारे 32 प्रांत आणि कॅनडातील चार प्रांतात हरिणांना हा साथीचा आजार झाला आहे. या आजाराला क्रॉनिक वेस्टींग डीसिजच्या श्रेणीत ठेवले आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात नागरिकांना सावधान रहायला सांगितले आहे. लोकांनी हरिण, मूस आणि एल्क अशा हरिणांचे मासं खाऊ नये असा इशारा अमेरिकेत आरोग्य विभागाने जारी केला आहे. या हरिणांच्या शरीरातील हा विषाणू जर मानवात आला तर मानवी जातीला धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
Zombie Deer Disease हा भयंकर आजार आहे. या आजाराने अमेरिकेत चिंता व्यक्त होत आहे. या आजाराने सध्या हरिण जातीच्या प्राण्यांमध्ये विचित्र लक्षणे जाणवत आहेत. हरिण, रेनडीएर, मूस आणि एल्क आणि कारिबू यांसारख्या हरिणांच्या विविध जातीत हा आजार पसरला आहे. आजारात जनावरांच्या मेंदूत असान्य कण मेंदूत जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मेंदू भ्रमित होतो. आणि जनावर चित्रविचित्र वागू लागतात. हरिण एक टक पाहू लागतात. ते शिकाऱ्यापासून पळून दूर जात नाहीत. हा आजार साथीचा आजार असून तो जनावरांच्या तरळ पदार्थ, लाळ, मलमूत्राचा वनस्पती किंवा मातीशी संपर्क झाल्यास पसरत जातो. हा आजार एखाद्या प्राणी संग्रहालय, तबेल्यात किंवा प्राणी रुग्णालयात पसरल्यास तर मोठ्या संख्येने प्राण्यांना त्याची लागण होऊ शकते असे म्हटले जाते.
हा आजार माकडांना झाल्यास….
हा आजार चिंताजनक आहे. हा आजार माकडांपर्यंत पोहचायला नको अशी चिंता संशोधकांना आहे. जर माकडांना हा आजार झाला तर ते मानवीवस्तीत रहात असल्याने मानवांत हा विषाणू पसरायला वेळ लागणार नाही असे म्हटले जात आहे. झोम्बी आजाराची लक्षणे दिसायला साधारण एक वर्षांचा कालावधी लागतो. या आजाराने बाधित जनावराची तपासणी केली असता ती अशक्त जाणवू लागतात. ती लवकर थकतात. त्यांना उत्साह राहात नाही. त्यामुळे ती धडपडू लागतात. सध्या या आजारावर औषधे नाहीत. त्यामुळे हरिणासारख्या झोंबी आजाराने ग्रस्त झालेल्या प्राण्यांना स्थलांतरीत करून इतर प्राण्यांपासून दूर ठेवले जात आहे. जनावरांचे मांस खाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा माणसांमध्ये हा आजार पसरू शकतो असे म्हटले जात आहे.