ना रुपये, ना डॉलर, पेट्रोल पंपात तेलही नाही; पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर

पाकिस्तान हे जगातील पाचव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. पण, या देशाची अवस्था सध्या श्रीलंका आणि व्हेनेझुयला देशांसारखी झाली आहे.

ना रुपये, ना डॉलर, पेट्रोल पंपात तेलही नाही; पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 3:06 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानवर (Pakistan) आर्थिक संकट कोसळलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बेल आऊट पॅकेज मिळावे, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. सध्या पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. महागाई प्रचंड वाढली (food grains expensive ) आहे. अन्नधान्याची किमती खूप जास्त आहेत. महागाई २७ टक्के वाढली आहे. विदेशी मुद्रा भंडारही दिवसेंदिवस कमी होत आहे. फक्त ३ अरब डॉलर उपलब्ध आहेत. यातून पाकिस्तान एक महिनाभरही आयात करू शकत नाही. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी पाकिस्तानात एफडीआय थांबवली आहे. चीनच्या कर्जाच्या बोझ्याखाली पाकिस्तान दबत आहे. अफगाणिस्तान आणि भारताशी चांगले संबंध नसल्याने पाकिस्तानातील व्यापाराचे संबंध कमी करण्यात आलेत. पाकिस्तान कुटनीती आणि राजनैतिक संकटाचा सामना करत आहे. मुस्लीम जगतातही पाकिस्तानबद्दल निराशेचे वातावरण आहे.

पाकची अवस्था श्रीलंकेसारखी

पाकिस्तान हे जगातील पाचव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. पण, या देशाची अवस्था सध्या श्रीलंका आणि व्हेनेझुयला देशांसारखी झाली आहे. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत मागे पडला आहे. पाकिस्तानातील महागाई गेल्या ५० वर्षांतील सर्वात जास्त महागाई आहे.

अन्नधान्याच्या किमतीत वाढ

विदेशी मुद्रा भंडारही कमी होत आहे. आता फक्त तीन अरब डॉलर विदेशी मृद्रा उरली आहे. यामुळं एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पाकिस्तान टिकाव धरू शकणार नाही. महागाई खूप वाढली आहे. गहू, कांदा, गॅस, सिलिंडरच्या भावात वाढ झाली आहे. २० किलो गव्हाचा आटा १ हजार १६४ रुपयांना झाला आहे. पाकिस्तानच्या बिझनेस काँसिलने अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी पाह हजार रुपयांची नोट बंद करण्याची सूचना केली आहे.

लाहोरमधील ७० पंपांवर नाही पेट्रोल

पाकिस्तानातील पेट्रोल पंपांमध्ये तेल नाही. पंजाब भागातील बऱ्याच पेट्रोल पंपांवर अशी परिस्थिती आहे. पाकिस्तान पेट्रोल पंप डीलर असोसिएशननं सांगितलं की, लाहोरमधील ४५० पेट्रोल पंपांपैकी ७० पेट्रोल पंपांवर तेल नाही. पाकिस्तानातील तेल कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पाकिस्तान बऱ्याच प्रमाणात दुसऱ्यांवर अवलंबून आहे. पाकिस्तानातील निर्यातीमध्ये कपडा आणि कृषीशी संबंधित वस्तू आहेत. पाकिस्तानचा खर्च वाढत आहे. त्यामानान उत्पन्न होत नाही. त्यामुळं पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.