North korea attack on South korea | उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये मतभेद अजिबात नवीन नाहीत. अनेक शांती करार झाल्यानंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये टोकाचा तणाव दिसून आलाय. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेवर 200 पेक्षा जास्त तोप गोळे डागले. जगामध्ये आधीपासूनच दोन युद्ध सुरु आहेत. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास. या युद्धाचा शेवट दिसत नाहीय. आतापर्यंत शांत दिसणारा उत्तर कोरिया आपला सर्वात मोठा शत्रू दक्षिण कोरियाला डोळे दाखवतोय.
दक्षिण कोरियाने शुक्रवारी उत्तर कोरियाई सीमेजवळील योनप्योंग बेटावरील नागरिकांना जागा खाली करण्यासाठी नोटीस दिली आहे. दक्षिण कोरियाच सैन्य या भागात लाइव्ह फायर अभ्यास करणार हे कारण यासाठी देण्यात आलय. काही तासापूर्वी व्हाइट हाऊसने उत्तर कोरियावर आरोप केला. उत्तर कोरियाने रशियाला मिसाइल दिली होती. त्याचा वापर युक्रेनवर हल्ल्यासाठी करण्यात आल्याचा उत्तर कोरियावर आरोप आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर 200 पेक्षा अधिक तोपगोळे डागले. दक्षिण कोरियाच यामध्ये काहीही नुकसान झालेलं नाहीय. हे तोपगोळे उत्तर सीमा रेषेजवळ पडले. दोन्ही देशातील ही समुद्री सीमा आहे.
लोकांच्या मनात दहशत
उत्तर कोरियाने 2018 सैन्य कराराच उल्लंघन केलय. वादग्रस्त पश्चिम समुद्र सीमा उत्तरेला पाण्यात 200 राऊंड फायरिंग केली असं दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने म्हटलय. येओनप्योंग बेटाजवळ हे गोळे डागण्यात आले. उत्तर कोरियाचा हा सराव चिथावणी असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटलय. या अभ्यासात कोणीही जखमी झालं नाही. तिथल्या आसापासच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशातील शत्रुत्व कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. या घटनेनंतर लोकांच्या मनात दहशत दिसून येतेय. युद्धाच आणखी एक मैदान तयार झालय.
1950 साली दोन्ही देशात भयंकर युद्ध
मागच्या 77 वर्षांपासून उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव आहे. दुसऱ्या विश्व युद्धानंतर कोरियाला जापानच्या नियंत्रणपासून वेगळ करण्यात आलं. त्यावेळी अमेरिका आणि सोवियत संघ यांच्या राजकीय डावपेचात हा भाग फसला. परिणामी 1948 मध्ये दोन भाग झाले. 1950 साली दोन्ही देशात भयंकर युद्ध झालं. पण त्यानंतर कटुता मिटलेली नाही.