त्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल आणि नेतान्याहू सरकारच अडचणीत आले
इस्रायलचे हमास विरोधात युद्ध सुरु केले असले तरी घरच्या आघाडीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हमासच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर नेतान्याहू सरकार अडचणीत आले आहे.
गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. यात दक्षिण इस्रायलमधील नोव्हा म्यझिक फेस्टीव्हल देखील हमासच्या अतिरेक्यांचा टार्गेट होता. या हल्ल्यात 21 वर्षीय शिरेल गोलन ही तरुणी थोडक्यात वाचली होती. परंतू रविवारी आपल्या 22 व्या वाढदिवसी तिने स्वत:चे जीवन अखेर संपविले. टाइम्स ऑफ इस्रायलच्या बातमीनुसार या घटनेनंतर गोलन कुटुंबियांनी नेतान्याहू सरकारला घेरले आहे.हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी गोलन हीच्या उपचाराकडे योग्य लक्ष दिले नाही. गोलन हीला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेबस डिसऑर्डर ( पीटीएसडी ) हा आजार झाला होता. एक वर्षांनंतर तिचा जीवनाशी संघर्ष संपला आहे.
मी तिला पाहीलेय तिच्यात तणावाची लक्षणे होती. ती मित्रमैत्रिणींना भेटू इच्छीत नव्हती.ती एकटीच रहाणे पसंद करीत होती. मी तिला स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता असे शिरेल हीचा भाऊ इयाल याने म्हटले आहे. आम्हाला सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नाही. जर तिची योग्य काळजी घेतली असती तर असे काही झाले नसते. इस्रायलने माझ्या बहिणीला दुसऱ्यांदा मारले आहे. एकदा ऑक्टोबरमध्ये मानसिक रुपाने तर दुसऱ्यांदा आता जेव्हा तिने 22 व्या जन्मदिनी शारीरिक रुपाने असे तिचा भाऊ इयाल याने सरकारवर आरोप करताना म्हटले आहे.
सरकारने जागे व्हायला हवे ..
सरकारने जागे होणे गरजेचे आहे अन्यथा आत्महत्येचे अनेक प्रयत्न होऊ शकतात. मी माझी बहीण गमावली आहे.परंतू मी आवाज उठवत आहे कारण अन्य लोकांनी त्यांच्या प्रियजनांना गमावू नये. हल्ल्यानंतर शिरेल हीला दोन वेळा रुग्णालयात दाखल केले होते. हल्ल्यानंतर शिरेल हीच्या PTSD ची लक्षणे विकसित होऊ लागली होती असे इयाल याने म्हटले आहे.आम्हाला सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही जी मदत मिळाली ती ट्राइब ऑफ नोवा कम्युनिटी एसोसिएशन या संस्थेकडून मिळाल्याचे इयाल याने म्हटले आहे.
शिरेल गोलन आणि तिचा पार्टनर या नोव्हा म्युझिक फेस्टीव्हल पार्टीला गेले होते. जेथे 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने हल्ला केला होता. या म्युझिक फेस्टीव्हलमध्ये 364 जणांची हत्या झाली होती. त्यातील अनेक महिलांवर गॅंगरेप झाला होता. फेस्टीव्हलमध्ये सहभागी अनेक लोकांची अपहरण करण्यात आले होते.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचा पलटवार
हमासच्या नृशंस हल्ल्यानंतर इस्रायलने बदला घेणे सुरु केले. गाझापट्टीत त्यांचे आजही युद्ध सुरु आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे प्रॉक्सी हुती आणि हेजबोल्लाचे अतिरेकी भडकले. या युद्धात त्यांची देखील एण्ट्री झाली. त्यांनी देखील इस्रायलवर हल्ले केले, त्यानंतर इस्रायलने हेजबोल्लाचा गड असलेल्या लेबनॉनची राजधानी बैरुत वर हल्ला केला. इस्रायलने हेजबोल्लाचा प्रमुख नसरल्लाह सह अनेक कमांडरचा खात्मा केला आहे. हमासचा प्रमुख याह्या सिनवार याचाही खात्मा इस्रायलने केला आहे.