आता दोनच पर्याय; एक तिसरे महायुद्ध किंवा आर्थिक निर्बंध, बायडन रशियावर संतापले
रशिया - युक्रेन युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, रशियाने आता आमच्यापुढे केवळ दोनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. एक म्हणजे तिसरे महायुद्ध किंवा रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालणे.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध (war between Russia and Ukraine) सुरू आहे. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर (Kiev) केलेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमारती उद्धवस्त झाल्या असून, हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्यस्थळे उद्धवस्त केले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. दरम्यान रशिया – युक्रेन युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, रशियाने आता आमच्यापुढे केवळ दोनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. एक म्हणजे तिसरे महायुद्ध किंवा रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालणे हे आहेत. दरम्यान अमेरिकेकडून या पूर्वीच या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध घातले असून, युरोपीयन संघामधील देशांनी रशियन बँकांना स्विफ्टमधून निष्कासीत केले आहे.
कडक आर्थिक निर्बंध
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बधांमुळे रशियाची कोंडी होईल असा दावा करण्यात येत आहे. तसेच रशियन बँकांना स्विफ्टमधून देखील निष्कासीत करण्यात आले आहे. पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला युद्ध थांबवा अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा दिलाय.
रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर
युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहेत. खुद्द रशियामधील नागरिक देखील रस्त्यावर उतरले असून, त्यांनी युक्रेनविरोधातील युद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.