VIDEO: बराक ओबामांवर ही वेळ का आली ?
अमेरिका : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या नम्र आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जातात. कदाचित त्यंच्या याच स्वभावामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात त्यांचे चाहते आणि फॉलोअर्स आहेत. ओबामा आता जरी राष्ट्राध्यक्ष नसले तरी ते काही ना काही असं करतच असतात, ज्यामुळे आपला त्यांच्यासाठीचा आदर आणखी वाढतो. अमेरिकेत आज म्हणजेच 22 नोव्हेंबरला थँक्स […]
अमेरिका : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या नम्र आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जातात. कदाचित त्यंच्या याच स्वभावामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात त्यांचे चाहते आणि फॉलोअर्स आहेत. ओबामा आता जरी राष्ट्राध्यक्ष नसले तरी ते काही ना काही असं करतच असतात, ज्यामुळे आपला त्यांच्यासाठीचा आदर आणखी वाढतो.
अमेरिकेत आज म्हणजेच 22 नोव्हेंबरला थँक्स गिव्हिंग डे साजरा केला जात आहे. त्यामुळे ओबामा यांनी मंगळवारी ग्रेटर शिकागो फूड डिपॉझिटरीला (Greater Chicago Food Depository) भेट दिली. येथे त्यांनी स्वत: जेवण बनविण्यास मदत करत थँक्स गिव्हिंग डे साजरा केला. ओबामा फाऊंडेशनने यासंबधीचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. यावेळी ओबामांनी अमेरिकेच्या जनतेला ग्रेटर शिकागो फूड डिपॉझिटरीला मदत करण्याचे आवाहन केले.
ओबामा यांनी पहिल्यांदाच थँक्सगिव्हिंग मील तयार करण्यात मदत केली असे नाही. त्यांनी राष्ट्राध्यक्ष असताना प्रत्येकवर्षी कुटुंबियांसोबत वॉशिंग्टन डी.सी. मधील फूड बँकमध्ये थँक्सगिव्हींगच्या आदल्या दिवशी जेवण वाटपाचे काम केले.
ग्रेटर शिकागो फूड डिपॉझिटरी ही एक स्वयंसेवी संस्था आहे, जी गरजू लोकांसाठी मोफत जेवण म्हणजेच थँक्सगिव्हिंग मील तयार करते. ही संस्था दरदोज 1 लाख 59 हजार लोकांची भूक भागवते.
The Greater Chicago @FoodDepository is a local non-profit organization that provides nourishing food for those in need. This Thanksgiving week, @BarackObama stopped by to give back. pic.twitter.com/I5ce5ypvEG
— The Obama Foundation (@ObamaFoundation) November 21, 2018