जगात प्रत्येकी 130 पैकी एक महिला आधुनिक गुलामगिरीचा बळी, संयुक्त राष्ट्राचा धक्कादायक अहवाल

जगभरात 2 कोटी 90 लाख महिला आजही आधुनिक गुलामगिरीचं जीवन जगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (United Nation Modern slavery report).

जगात प्रत्येकी 130 पैकी एक महिला आधुनिक गुलामगिरीचा बळी, संयुक्त राष्ट्राचा धक्कादायक अहवाल
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 9:10 PM

न्यू यॉर्क : जगभरात 2 कोटी 90 लाख महिला आजही आधुनिक गुलामगिरीचं जीवन जगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (United Nation Modern slavery report). संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये हे उघड झालं आहे. समाजात आजही ही गुलामगिरी जबरदस्तीने काम करायला लावणं, जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडणं, कर्ज देऊन बंधक बनवणं आणि कौटुंबिक गुलामगिरी या प्रकारे ही गुलामगिरी अस्तित्वात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक महिला आधुनिक गुलामगिरीच्या बळी

जगभरातील आधुनिक गुलामगिरीचा बळी ठरलेल्या महिलांची आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. वॉक फ्री अँटी-स्लेवरी ऑर्गनायजेशनचे सह-संस्थापक ग्रेस फॉरेस्ट म्हणाले, “प्रत्येकी 130 पैकी एक महिला किंवा मुलगी आज आधुनिक गुलामगिरीचं जीवन जगत आहे. खरंतर मानवी इतिहासात कधीही जितके गुलामगिरीचं जीवन जगणारे नागरिक नव्हते तेवढे आज आहेत. दुसरीकडे आजचा विकसित समाज महिलांसाठी सर्वात चांगला असल्याचं मानलं जातं.”

आधुनिक गुलामगिरीची व्याख्या काय?

ग्रेस फॉरेस्ट म्हणाले, “कोणतीही एक व्यक्ती आर्थिक किंवा इतर कोणत्याही स्वार्थासाठी दुसऱ्या व्यक्तीचं शोषण करत असेल आणि त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य टप्प्याटप्प्याने संपवत असेल तर त्याला ‘वॉक फ्री अँटी-स्लेवरी ऑर्गनायजेशन’ आधुनिक गुलामगिरी म्हणते. आधुनिक गुलामगिरीचा बळी ठरलेल्या महिलांवरील हे संशोधन संयुक्त राष्ट्राच्या ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन’ आणि ‘इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेशन’ या अहवालांवर आधारीत आहे.”

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ

या अहवालाच्या स्टॅक्ड ऑड्स कॅटेगरीत लिहिलं आहे, “लैगिंग शोषणाच्या पीडितांपैकी 99 टक्के महिला आहेत. जबरदस्तीने लग्न लावले जाणाऱ्या पीडितांपैकी 84 टक्के आणि जबरदस्तीने काम करायला लावले जाणाऱ्या पीडितांपैकी 58 टक्के महिला आहेत.” बदलत्या काळानुसार गुलामगिरीचा चेहरा मूळातून बदलला आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

136 देशांमध्ये बालविवाह आणि संमतीशिवाय विवाहाला गुन्हा घोषित करण्याची मागणी

फॉरेस्ट म्हणाले, “वॉक फ्री आणि संयुक्त राष्ट्राचा प्रत्येक महिला आणि बाल उपक्रम (Every Woman Every Child Program) आधुनिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या मागणीसाठी एक जागतिक अभियानाची सुरुवात करत आहे. या कार्यक्रमातून बाल विवाह आणि जबरदस्तीने लग्नासारखे गुन्हे नष्ट करण्याचा आग्रह केला जाईल. जगभरात आताही 136 देशांमध्ये या गोष्टींना गुन्हा मानला जात नाही.”

बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून महिला कामगारांचं होणारं शोषण यावरही हा उपक्रम पारदर्शकतेची मागणी करणार आहे. कापड, कॉफी, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडत असल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

मसूद अजहरवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेची नवी रणनीती

One in every 130 females globally living in Modern slavery says United Nations report

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.