US Pentagon : या 21 वर्षीय तरुणाची अमेरिकेला दहशत! हेरगिरीचे काय आहे प्रकरण, नाटोसह मित्र राष्ट्रे का हादरली

US Pentagon : जगाची दादा असलेली अमेरिका एका 21 वर्षीय तरुणामुळे हादरली आहे. हा तरुण राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा दावा संरक्षण खात्याने केला आहे, नेमकं काय आहे प्रकरण..

US Pentagon : या 21 वर्षीय तरुणाची अमेरिकेला दहशत! हेरगिरीचे काय आहे प्रकरण, नाटोसह मित्र राष्ट्रे का हादरली
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 7:28 PM

नवी दिल्ली : जगाची दादा असलेली अमेरिका सध्या हादरली आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेच्या संरक्षण खात्याची झोप सध्या उडालेली आहे. एका 21 वर्षीय तरुणामुळे संरक्षण खाते अवाक झाले आहे. या तरुणाची चौकशी करण्यात आली. पण त्यातून त्यांच्या हाती आरोपांशिवाय, संशयाशिवाय काही लागले नाही. पण हा तरुण राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा संरक्षण खात्याने केला आहे. अमेरिकेतील संरक्षण मंत्रालय पेंटागनमधून (Pentagon) टॉप सीक्रेट फाईल गायब झाल्या आहेत. त्यामुळे महासत्तेची सुरक्षा यंत्रणा सैरभैर झाली आहे. त्यातच या अत्यंत संवेदनशील माहिती असलेल्या फाईल्स (Top Secret Files) गायब झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका उत्पन्न झाला आहे.

हा तरुण अटकेत गोपनिय कागदपत्रे फोडल्यामुळे संरक्षण यंत्रणेने 21 वर्षीय जॅक टेक्सीरा (Jack Teixeira) याला एफबीआयने गेल्या महिन्यात अटक केली होती. अमेरिकेतील न्याय विभागाने जॅकला जर सोडून देण्यात आलं तर राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका उत्पन्न होईल, असा इशारा दिला आहे. फेडरल कोर्टासमोर याप्रकरणात सुनावणी सुरु आहे. जॅकला सोडल्यास राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात येईल, याची बाजू न्याय विभागाने मांडली. तसेच त्याला ट्रायलपूर्वी न सोडण्याची विनंती केली.

कोणती गोपनिय माहिती केली उघड पेंटागनमधून अत्यंत गोपनिय माहिती उघड झाल्याने मित्र राष्ट्रांनी अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेन युद्धासंबंधीची अत्यंत गोपनिय माहिती, योजना, दोस्त राष्ट्रांचा समावेश याविषयीची ही माहिती होती. त्यामुळे बायडन सरकारला जागतिक मंचावर नाराजीसोबतच रोषाचा सामना करावा लागला. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट ठरली. न्यूयॉर्क टाईम्सनुसार, जॅकने ही गोपनिय माहिती त्याच्या गेमिंग ग्रूपमध्ये शेअर करुन प्रशासन आणि संरक्षण विभागाची झोप उडवून दिली.

हे सुद्धा वाचा

कोण आहे जॅक टेक्सीरा जॅक मॅसाच्युसेट्स येथे एअर नॅशनल गार्डसमॅन म्हणून कार्यरत होता. 2019 मध्ये एअर नॅशनल गार्डमध्ये तो रुजू झाला. तो आयटी तज्ज्ञ म्हणून काम करत होता. जॅकने अमेरिकेच्या अनेक प्रकल्पाची अत्यंत गोपनिय माहिती गेमिंग ग्रूपमध्ये शेअर केली. त्याने ठग शेअर सेंट्रल या नावाने हा ग्रूप तयार केला होता. त्याच्या या कृत्यामुळे नाटो देश चिंताग्रस्त झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्धासह नाटोच्या काही आगामी प्रकल्पाची माहिती पण लीक झाल्याने नाटो देश चिंतेत पडले आहेत.

अनेक देश-एजंटना धोका ही माहिती लीक झाल्याने नाटो, मित्र राष्ट्रांच्या योजनांवर पाणी फेरले गेले. त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर गुप्तहेरांचे नेटवर्कही हादरले आहे. काही एजंटची माहिती यामुळे लीक झाल्याने त्यांच्या जीवाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...