चिकन टिक्का मसाला पिझ्झा ऑर्डर केला, खाताच बिघडली तब्येत, थेट मृत्यूच झाला
आपल्या मित्रासोबत या व्यक्तीने पिझ्झा ऑर्डर केला होता. या चिकन टिक्का मसाला पिझ्झाचा संपूर्ण एक स्लाईस देखील त्याने खाल्ला नव्हता. काही घास खाताच त्याची तब्येत अचानक बिघडली. आता या प्रकरणात कोर्टात सुनावणी सुरु आहे.
मुंबई | 11 जानेवारी 2024 : जगभरात पिझ्झा खाण्याचे प्रमाण वाढत आहे. फूड डिलिव्हरी एपच्या मदतीने झटपट ऑर्डर करता येत असल्याने लोक भूक लागतात पिझ्झा ऑर्डर करीत असतात. त्यामुळे विविध फ्लेवर्सच्या पिझ्झांना खूपच मागणी आहे. परंतू एका व्यक्तीचा पिझ्झा खाताना चक्क मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याने पिझ्झाची संपूर्ण स्लाईस देखील खाल्ली नव्हती. केवळ काही घास त्याने खाल्ले आणि खेळ संपला. या मागचे कारण समोर आले आहे. ते खूपच आश्चर्यकारक आहे. या इसमाची तब्येत खराब झाल्यानंतर त्याने डॉक्टरांना विचारले होते माझा मृत्यू होईल काय ? नंतर खरोखरच त्याचा मृत्यू झाला.
डेली स्टारच्या बातमीनूसार 23 वर्षांच्या जेम्स स्टुअर्ट एटकिंसन याने हा पिझ्झा ऑर्डर केला होता. त्याने चिकन टिक्का मसाला पिझ्झा ऑर्डर केला होता. त्याने त्या पिझ्झाचा एक स्लाईसही धड खाल्ला नव्हता. त्यातच त्याची तब्येत अचानक बिघडली. जेम्सच्या मित्राने सांगितले की त्याच्या अलर्जीचा त्रास होता. त्याने अॅलेर्जी दूर करणारे इंजेक्शन देखील शोधले परंतू ते सापडले नाही. पॅथोलॉजिस्ट जेनिफर बोल्टन यांनी सुनावणी सांगितले की तपासात पिझ्झात भुईमुगाच्या शेंगाचा वापर केला होता. तपासणीत त्याच्या पोटातही भुईमुगाच्या शेंगाचे तुकडे आढळले.
उपचारादरम्यान मृत्यू
जेम्सचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपासात असे उघड झाले की जेम्सचा फ्लॅटमेंट आणि एक मित्र या दोघांनी न्यूकास्ल येथील ददयाल रेस्टॉरंटमधून 10 जुलै 2020 रोजी पिझ्झाची ऑर्डर दिली होती. जेम्स यास भुईमुगाच्या शेंगाची एलर्जी आहे. जेम्स याला 2010 मध्ये देखील भुईमुगाच्या शेंगाची एलर्जी झाली होती. त्यानंतर कोणताही पदार्थ खाताना इंटरनेटवर त्यात कोणते घटक वापरले आहेत ते सर्च करीत असत. परंतू पिझ्झा ऑर्डर करताना त्यांनी पिझ्झात कोणते घटक वापरले आहेत हे विचारायला नेमके विसरले आणि त्यांच्यासाठी हे जीवावर बेतले. जेम्सच्या घरी त्याचा उपचार करणारे डॉक्टर स्टीफन गिलेस्पी यांनी सांगितले की त्यांना आठवतंय जेम्सने फोनवर भुईमुगाच्या शेंगाचा उल्लेख केला होता.