Israel-Hamas War मुळे 57 मुस्लीम देशांच्या OIC चा मोठा निर्णय
OIC ही संयुक्त राष्ट्रानंतर जगातील सर्वात मोठा इंटर गव्हर्नमेंटर ग्रुप आहे. चार खंडातील 57 देशातील सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व ही संघटना करते.
नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यान भीषण युद्धामुळे इस्लामिक देश देखील अस्वस्थ झाले असून ते देखील एक्शन मोडमध्ये आले आहेत. एक आठवड्यापासून सुरु असलेल्या रक्तरंजित संघर्षाने 57 मुस्लीम देशांच्या संघटन ऑर्गेनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन ( OIC ) ने आपात्कालिन बैठक बोलावली आहे. या संघटनेने शनिवारी एक पत्रक जारी करीत सौदी अरब यांच्या मागणीवरुन येत्या बुधवारी ओआयसीच्या कार्यकारणीची एक मंत्रीस्तरीय बैठक बोलावल्याचे जाहीर केले आहे.
ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनचा एक प्रमुख देश सौदी अरबने मंगळवारी ओआयसीची आपात्कालिन बैठक बोलाविण्याची मागणी केली होती.ओआयसीत सौदी अरब आणि त्याचे सहकारी देशांचा दबदबा आहे. या संघटनेचा उद्देश्य आंतराराष्ट्रीय पातळीवर शांती आणि सद्भाव कायम ठेवून मुसलमानांचे संरक्षण करणे हा आहे.
ओआयसीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ,सौदी अरबच्या मागणीवरुन गाझामध्ये इस्रायल सैनिकांनी सुरु केलेल्या कारवाईत निशस्र सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी बुधवारी ओआयसीच्या कार्यकारी समितीची एक तातडीची बैठक बोलावली आहे. किंगडम ऑफ सौदी अरब, जे सध्या इस्लामिक शिखर संमेलन आणि इस्लामिक सहकार्य संघटनेचे कार्यकारी समिती अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या मागणीवरुन संघटनेने ही आपात्कालिन ओपन- एंडेड असाधारण बैठक बोलावली आहे. गाझामध्ये सुरु झालेल्या सैन्य कारवाईत तेथील नागरिकांच्या प्राणाचे संरक्षण आणि स्थैर्याबाबत बिघडत्या परिस्थितीवर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश्य आहे. ओआयसीची ही बैठक 18 ऑक्टोबर 2023 रोजी जेद्दाह येथे होणार आहे.
येथे पाहा पोस्ट –
At the invitation of #SaudiArabia: An urgent Ministerial Meeting of the Executive Committee of the #OIC to Discuss the Military Escalation and the Threat to Defenseless Civilians in #Gaza is Scheduled for Wednesday in #Jeddah: https://t.co/wZvaCyIVvb pic.twitter.com/SMYGEfSuUW
— OIC (@OIC_OCI) October 14, 2023
इराण आणि सौदी अरबने केली मागणी
सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी मंगळवारी ओआयसीची आपात्कालिन बैठक लवकर बोलविण्याची मागणी केली होती. तसेच सौदी किंग सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी मंत्रिपरिषदेने देखील बैठक घेतली होती. यात आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत सलमान यांनी चर्चा केली होती. प्रिन्स सलमान यांनी पॅलेस्टाईन, जॉर्डन आणि इजिप्तचे राष्ट्रपती आणि अन्य प्रमुखांशी फोनवर बातचीत केली होती. यावेळी गाझातील तणाव कमी करणे, पॅलेस्टिनी नागरिकांच्या वैध अधिकार आणि स्थायी शांतीसाठी सौदी अरबच्या कटीबध्देतवर चर्चा करण्यात आली.
भारत सदस्य नाही
OIC ही संयुक्त राष्ट्रानंतर जगातील सर्वात मोठा इंटर गव्हर्नमेंटर ग्रुप आहे. चार खंडातील 57 देशातील सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व ही संघटना करते. भारत जगातील तिसरा मुस्लीम लोकसंख्येचा देश असून या संघटनेत नाही. तर रशियात केवळ 2.5 कोटी मुस्लीम असून रशिया पर्यवेक्षक म्हणून या संघटनेत सामील आहे.