शारीरिक संबंधातून वेगाने वाढतोय हा आजार, व्हावे लागेल सावधान

शारीरिक संबंधातून होणाऱ्या सिफलिस आजाराच्या संक्रमणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार डोळ्यांसह विविध अवयवांना होऊ शकतो. त्याच्यावर निदान झाल्यास उपचार शक्य आहेत. परंतू दुर्लक्ष केल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो असे म्हटले जात आहे.

शारीरिक संबंधातून वेगाने वाढतोय हा आजार, व्हावे लागेल सावधान
ocular syphilisImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 6:01 PM

मिशिगन | 4 डिसेंबर 2023 : अमेरिकेतील मिशिगनमध्ये डोळ्यांशी संबंधित ‘ऑक्युलर सिफिलीस’ या आजाराची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. पाच महिलांना एका व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांना हा आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. ‘ऑक्युलर सिफिलीस’ हा सर्वसाधारण आजार नाही. परंतू संक्रमण झालेल्यांपैकी एक टक्के प्रकरण ऑक्युलर सिफलिसची असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा आजार वेगाने पसरत असल्याने घबराट पसरली आहे.

ऑक्युलर सिफीलीस आजारचे अनेक प्रकार आहेत, त्यामुळे त्याचे निदान करणे अवघड झाले आहे. परंतू याचा उपचार करणे खूप अवघड नसल्याने त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. जर ऑक्युलर सिफीलीसच्या उपचार केला नाही तर मात्र तो वर्षानुवर्ष वाढू शकतो. ज्यामुळे विविध अवयवांना नुकसान पोहचते. जर त्याची इलाज वेळीच केला नाही तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. तो डोळ्यांच्या प्रत्येक स्नायूंना प्रभावित करू शकतो. ज्यात कॉर्निया, आयरीस, ऑर्बिट, पापण्या, रेटीना, ऑप्टीक तंतू आणि श्वेतपटल यांचा समावेश आहे. हा आजार सुजेच्या स्वरुपात प्रकट होत असतो. तर काही वेळी संक्रमण एकदम सुक्ष्म स्वरुपात असू शकते.

सिफिलीसचा उपचार थांबविल्यास अन्य उपचार होऊ शकणाऱ्या आजाराचा उपचारात अडथळा येऊ शकतो. उदाहरणार्थ एचआयव्ही संक्रमण सिफिलीस रोग्यांमध्ये सर्वसामान्य बाब आहे. एचआयव्ही संक्रमणामुळे ऑक्युलर सिफीलीस वेगाने वाढू शकतो. डोळ्यांशी संबंधित सिफिलीसचे निदान न झाल्यास उपचार होऊ शकणाऱ्या एचआयव्हीचे देखील निदान होणार नाही. मिशिगनमधील ज्या पाच महिलांना हा आजार झाला आहे त्यांना एकाच पुरुषांपासून हा आजार झाला आहे.

दृष्टी खराब होऊ शकते

मिशिगनच्या या पाच महिलांमध्ये या आजाराची वेगवेगळी लक्षणे दिसली. डोळ्यांमध्ये सूज आल्यापासून ते विविध स्वरुपाचे आजार त्यांना झाले. परंतू सुदैवाने त्यांचे वेळीच निदान झाल्याने आजाराचा पत्ता लागला. कधीकधी ओक्युलर सिफिलीसचे निदान होत नाही त्यामुळे रेटीनामध्ये हळूहळू संक्रमण सुरु होते. हा ‘रेटिनायटिस पिगमेंटोसा’ नावाच्या वारसाने मिळालेल्या आजाराचे स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे या रोग्यांना अनुवांशिक आजार असल्याचे म्हटले जाते. यात उपचार होत नाहीत, त्यांच्या दृष्टी खराब होऊ शकते. सिफिलीस संबंधीत समस्या वाढून त्यांच्या मस्तिष्कावर परिणाम होऊ शकतो.

जुना आजार

‘रेटीनायटिस पिगमेंटोसा’वर उपचार नाही असे नाही. अशा अनेक रुग्णांवर उपचार झाले आहेत. निदानानंतर ओक्युलर सिफिलीस आढळला. सिफिलीस ट्रेपोनेमा पॅलिडम नामक जीवाणूमुळे होतो. हा एक जुना आजार आहे. 1493 मध्ये क्रिस्टोफर कोलंबसने युरोपमध्ये यासंदर्भात नोंद केली होती, परंतू आज हा आजार प्रचलीत आहे.

एंटीबायोटिक उपचार

ब्रिटीनमध्ये सिफलिस संक्रमणाची संख्या 2022 मध्ये वाढून 8,692 झाली, साल 2021 मध्ये 7,543 संख्या होती. त्यात 15 टक्के वाढ झाली आहे. ही 1948 नंतर ही सर्वाधिक संख्या आहे. निदानानंतर रुग्णाचे डोळे पुन्हा पुर्ववत झाले आहेत. तो डोळ्यांसह अनेक अवयवांना खराब करु शकतो. सिफिलीस एक लैंगिक मार्गाने होणार आजार म्हणून वाढत आहे. एंटीबायोटिक औषधांनी तो बरा होऊ शकतो. अन्य नेत्र रोगांमध्ये ते शक्य नसते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.