कोरोनाकाळात अँटिबायोटक्स घेणे पडू शकते महागात, ‘हा’ आजार बळावण्याची शक्यता

अँटिबायोटिक्सच्या अतीसेवनामुळे गनोरिया नावाचा लैंगिक आजार उद्भवण्याची शक्यता जागितक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. (antibiotics corona pandemic gonorrhea)

कोरोनाकाळात अँटिबायोटक्स घेणे पडू शकते महागात, 'हा' आजार बळावण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 3:40 PM

स्वित्झर्लंड : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोनाला पूर्णपणे थोपवू शकेल असे प्रभावी औषध किंवा लस अजूनही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे कोरोना संसर्गापासून स्व:तला वाचवण्यासाठी नागरिकांकडून अनेक उपाय अवलंबले जात आहेत. काही नागरिक अँटिबायोटिक्स जास्त प्रमाणात घेत आहे. मात्र, अँटिबायोटिक्सच्या अतीसेवनामुळे गनोरिया नावाचा लैंगिक आजार उद्भवण्याची शक्यता जागितक आरोग्य संघटनेने (WHO) वर्तवली आहे. प्रमाणापेक्षा जास्त अँटिबायोटिक्सच्या सेवानामुळे सुपर गनोरिया (super gonorrhea) नावाचा लैंगिक आजार बळावू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे. (overuse of antibiotics in corona pandemic may cause of gonorrhea)

कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्यातरी प्रभावी औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सुरुवातीला अँटिबायोटिक्स वापरण्याचा सल्ला दिला गेला होता. अमेरिकेत मार्च ते एप्रिल महिन्यात 70 टक्के लोकांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून अँटिबायोटिक्स देण्यात आले होते. कोरोनवर मात करण्यासाठी अजूनही रुग्णांना मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक्स दिले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिबायोटिक्सच्या अती सेवनामुळे सुपर गनोरिया हा लैंगिक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. गनोरिया हा आजार पसरवणाऱ्या बॅक्टेरियामध्ये प्रतिकार क्षमता वाढत चालली आहे. तसेच, कोरोना महामारीच्या काळात लैंगिक आजारांवर योग्य पद्धतीने उपचारही मिळत नाहीयेत. त्यामुळे रुग्ण स्व:तच अँटिबायोटिक्स घेत आहेत. यामुळेसुद्धा सुपर घनोरिया हा आजार वाढतोय. ब्रिटनमधील औषनिर्मीती करणारी कंपनी बायोटाकफेरिक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन कॉक्स यांनी द सन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुपर गनोरियाच्या प्रतिकार शक्तीबद्दल सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात हा आजार असाध्य होऊ शकतो.

गनोरिया आजार काय आहे?

हा आजार नीसीरिया गोनोरिया या बॅक्टेरियापासून पसरतो. असुरक्षित संबंध, ओरल सेक्स, अनैसर्गिक संबंध यांच्यामार्फत तो पसरतो. चिंतेची बाब म्हणजे, हा आजार ठीक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अँटिबायोटिक्साचा या बॅक्टेरियावर कुठलाही परिणाम होत नाहीये. त्यामुळे हा आजार भाविष्यात असाध्य होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

जगभरात 9 कोटी रुग्ण

जगभरात या आजाराचे जवळपास 9 कोटी रुग्ण आहेत. आफ्रिक आणि युरोपमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आहे. 2017 ते 2018 या काळात या रोगाचे प्रमाण 22 टक्क्यांनी वाढले आहे.

संबंधित बातम्या :

Brain Eating Amoeba | कोरोनाच्या संकटात आणखी एक धोका, अमेरिकेत ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ची दहशत!

कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!

कोरोनाच्या नव्या प्रजातीवर ‘ही’ लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तर

(overuse of antibiotics in corona pandemic may cause of gonorrhea)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.