Corona | ताजी हवा विक्रीला, अर्धा लीटर शुद्ध श्वासांची किंमत ऐकून चक्रवाल
ही कंपनी इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि उत्तरी आयरलँडची ताजी हवा भरलेल्या ‘विश्वसनीय’ बाटल्या विकत आहे.
नवी दिल्ली : कोरोनामुळे प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आल्याने अनेक लोक यावर्षी आपल्या देशात (Packed Bottle Of Fresh Air), आपल्या शहरात जाऊ शकले नाही. ते त्यांच्या घरापासून लांब राहिले. कोरोनाची लस आल्यानंतर आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लोकांना थोडी आशा होती. पण, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या अवताराने पुन्हा एकदा परिस्थितीत आधीसारखी झाली आहे. अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमान रद्द केली आहेत. त्यामुळे अनेक जण त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत (Packed Bottle Of Fresh Air).
यादरम्यान, ‘My Baggage’ नावाच्या वेबसाईटने घरात अडकलेल्या लोकांना ताज्या हवेचं गिफ्ट दिलं आहे. कंपनीने हे गिफ्ट विदेशात अडकलेल्या ब्रिटनच्या नागरिकांसाठी तयार केलं आहे. ही कंपनी इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि उत्तरी आयरलँडची ताजी हवा भरलेल्या ‘विश्वसनीय’ बाटल्या विकत आहे. ज्यामुळे ब्रिटनच्या लोकांना त्यांच्या घरी असल्याची जाणीव होईल.
ही एक 500 मिलीची बाटली 33 डॉलर म्हणजेच जवळपास 2,434 हजार रुपयांची येते. ही बॉटल एक कॉर्क स्टॉपरसोबत येते, ज्यातून जेव्हाही गरज असेल तेव्हा यातील सुगंध घेतला जाऊ शकतो. ब्रिटनच्या चार देशांव्यतीरिक्त कंपनी ब्रिटनच्या दुसऱ्या ठिकाणांवरुनही स्पेशल ऑर्डर घेऊ शकते. कंपनीने सांगितलं की नुकतंच त्यांनी एक वॅल्शमॅनचा ऑर्डर पूर्ण केला आहे. या व्यक्तीने उत्तर-पश्चिम वेल्सच्या स्नोडोनिया येथील डोंगराळ भागात हवेच्या सँपलचं ऑर्डर दिलं.
स्पेशल एडिशन बाटल्यांमध्ये लंडन अंडरग्राऊंड किंवा नोरफोकची फिश अँड चिप शॉप येथून घेण्यात आलेली हवा असते. माय बॅगेजच्या टीमने सांगितलं, रिसर्चनंतर बॉटल एअर लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना भावनिक दृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
कोरोनाच्या नव्या प्रजातीवर ‘ही’ लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तरhttps://t.co/ukcWTm6sdV#corona #SputnikV #CoronaVaccine #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
Packed Bottle Of Fresh Air
संबंधित बातम्या :
कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!
कोरोना विषाणूचा नवा प्रकार धोकादायक, वेगाने प्रसार – बोरिस जॉन्सन