इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; जवळच्या माणसांनीही सोडून दिला हात…
पाकिस्तानविरोधातील कटांचा पर्दाफाश करत राहतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना हिंसक राजकारण करण्यापासून रोखण्याचा पक्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याने प्रयत्न केला नाही असा आरोप त्यांनी इम्रान खान यांच्यावर केला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी मानवाधिकार मंत्री डॉ. शरीन मजारी यांनी तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे. त्या इम्रान खान यांच्या अत्यंत जवळच्या नेत्या मानल्या जातात. त्यांना मंगळवारी पाचव्यांदा अटक करण्यात आल्याने पाकिस्तान चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की सरकार आणि लष्कराच्या कारवाईला मजारी शाहबाज शरीफ घाबरले आहेत का? असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.
इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्या आजपासून पीटीआय किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा भाग असणार नाहीत असंही सांगण्यात येत आहे.
मजारी यांनी राजकारण सोडल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच त्यांनी मुलीच्या परीक्षेचा हवाला देत काही कारणं स्पष्ट केली आहेत.
पाच महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याचेही त्यांनी कारण सांगितले आहे. ते जिवंत असताना खूप काही करता आले असते कारण त्यांनी मुलांची काळजी घेतली असती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या मुळे मुलांचा आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माम झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मजारी यांना अटक झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. तर 9 मे रोजी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती.
त्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती आणि लष्करी अधिकाऱ्यांची यावेळी घरेही जाळण्यात आली होती. त्यानंतर, मजारीसह किमान पीटीआयच्या 13 नेत्यांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती मात्र, त्यांना त्यानंतर न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.
शिरीन मजारी यांच्यानंतर पीटीआयची आणखी एक विकेट पडली आहे. फय्याजुल हसन चौहान यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.
त्यांना वरिष्ठ पातळीवरचे नेते समजले जात होते. त्यांनी लष्कराचे जोरदार कौतुक केले आहे. ते म्हणाले होते की, यांचे कुटुंब लष्कराच्या प्रेमात बुडाले आहे.
तसेच यापुढेही पाकिस्तानविरोधातील कटांचा पर्दाफाश करत राहतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना हिंसक राजकारण करण्यापासून रोखण्याचा पक्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याने प्रयत्न केला नाही असा आरोप त्यांनी इम्रान खान यांच्यावर केला आहे.