Pakistan Bomb Blast : क्वेटा रेल्वे स्टेशनवर सूसाईड अटॅक; या संघटनेने पाकिस्तानला हादरवलं, 14 सैनिकांसह 25 लोकांचा मृत्यू

Pakistan Quetta Railway Station Bomb Blast : पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्टेशनवर शनिवारी मोठा बॉम्ब स्फोट झाला. हा सूसाईड हल्ला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पेशावर शहराला जाणाऱ्या रेल्वेला निशाण करण्यात आले.

Pakistan Bomb Blast : क्वेटा रेल्वे स्टेशनवर सूसाईड अटॅक; या संघटनेने पाकिस्तानला हादरवलं, 14 सैनिकांसह 25 लोकांचा मृत्यू
बलूच क्वेटा बॉम्बस्फोट
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 3:37 PM

पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्टेशनमध्ये मोठे बॉम्ब स्फोट झाला. हा सूसाईड धमाका असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिकांसह 24 लोकांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. या हल्ल्यात पेशावर शहराला जाणाऱ्या रेल्वेला निशाण करण्यात आले. अचानक झालेल्या या धमाक्याने क्वेटा शहर हादरले. सुरुवातीपासूनच हा हल्ला स्थानिक बंडखोरांनी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. क्वेटाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक मोहम्मद बलूच यांनी सांगितले की जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पेशावरसाठी रेल्वे निघण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशनच्या बुकिंग कार्यालयात हा स्फोट करण्यात आला. जाफर एक्सप्रेस ही सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी हा धमाका झाला. मृतकांचा आकडा वाढण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांवी व्यक्त केली आहे.

या संघटनेने घेतली जबाबदारी

हे सुद्धा वाचा

बलूच लिबरेशन आर्मी या संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्याने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती समाज माध्यमावर दिली आहे. “आम्ही क्वेटा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी लष्करावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी घेत आहोत. आज सकाळी, क्वेटा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानच्या लष्कराच्या एका तुकडीवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. हे लष्करी जवान इन्फ्रेंट्री स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण करून जफर एक्सप्रेसने परतत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. आमच्या संघटनेच्या मजीद ब्रिगेडने हा हल्ला घडवला आहे. लवकरच याविषयीची विस्तृत माहिती आम्ही समाज माध्यमावर प्रसारित करू.” असे BLA च्या प्रवक्त्याने सांगितले.

पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची इच्छा नसताना बळजबरीने बलूचिस्तान हिसकावण्यात आल्याचा आरोप येथील जनता करते. त्यातूनच पुढे सशस्त्र उठाव सुरू झाला. पाकिस्तान सरकारने बलूचिस्तानमध्ये चीन सरकारला मुक्त हस्ताने जमिनी दान दिल्या आहेत. तिथे त्यांचे कारखाने सुरू आहेत. तिथे पण काही वर्षापूर्वी बंडखोरांनी मोठे हल्ले केले होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.