Pakistan Inflation: महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानमध्ये पारलेजी बिस्कीट कितीला मिळतयं?
पाकिस्तानातील दुकानदाराने सांगितले की, जिवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जे बिस्किट 5 रुपयांना विकायचे ते आता...
मुंबई, पाकिस्तानमध्ये (Pakistan Inflation) अक्षरशः महागाईचा वनवा पेटला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. महागाई या स्थरावर गेली आहे की, भारतात 5 रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट (Parle G) पाकिस्तानात (Pakistan News) 50 रुपयांना विकले जात आहे. आपल्या देशात 40-50 रुपयांना मिळणारी ब्रेड पाकिस्तानमध्ये 150-200 रुपयांना विकली जात आहे. मूठभर पीठासाठी लढाई सुरू आहे. शिवाय पिठाच्या गोण्यांच्या सुरक्षेसाठी एके-47 असलेले सैनिक तैनात आहेत. पिठ मिळावे यासाठी लोकं टाहो फोडत आहेत. दहशतवादाला खतपाणी घालनाऱ्या देशात आज महागाईमुळे हाहाकार माजला आहे. मात्र असे असतानाही दहशतवाद्यांची अकड मात्र कायम आहे. बिलावलसारखे त्यांचे नेते भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरत असतात.
पाकिस्तानातील दुकानदाराने सांगीतली हकीकत
पाकिस्तानातील दुकानदाराने सांगितले की, जिवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जे बिस्किट 5 रुपयांना विकायचे ते आता 50 रुपयांना विकले जात आहे. 450 रुपये किलोने पीठ विकले जात आहे. रिफाइंड तेल 850 प्रति लिटर झाले आहे. दरात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पाकिस्तानात जनता रस्त्यावर आली आहे. सरकारने आम्हाला मारले तर बरे, असे लोकं म्हणत आहेत. लोकं वाहनांच्या खाली जिव देण्याचा प्रयत्न करीत आहेत.सोशल मीडियावर येथील दुर्दशा पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.
“आटा नहीं दे सकते तो हमारे ऊपर गाड़ी चढ़ा दो हमें ख़त्म करदो…” आटा नहीं मिलने पर Pakistan के लोग सड़कों पर लेटकर मरने की धमकी दे रहे है…#PakistanEconomy #Pakistan pic.twitter.com/zzWTJAHLCG
हे सुद्धा वाचा— Jyot Jeet (@activistjyot) January 9, 2023
महागाईचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल
एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडीखाली पडून आहे आणि म्हणत आहे की, जर तुम्हाला पीठ देता येत नसेल, तर कार आमच्या अंगावर चढवा, आम्हाला संपवा. आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लोकं पिठासाठी भांडताना दिसत आहेत. हे भांडण, या दंगली पाकिस्तानात पिठासाठी होत आहेत, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये शेकडो महिला ट्रकच्या मागे धावत आहेत. या ट्रकमध्ये पिठाची पोती भरलेली दिसत आहे. परकीय पैशावर पोसणाऱ्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचे समर्थन केले आहे. त्याचा त्यांनी भारतासाठी भरपूर उपयोग केला.
अमेरिकेने केली पुन्हा मदत
अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा मदत केली आहे. परकीयांच्या तुकड्यांवर वाढलेला हा देश आपल्याच कृत्याची शिक्षा भोगत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशात कंपन्या येत नाहीत. परदेशी गुंतवणूक नाही. वर्षभरापूर्वी आलेल्या पुराचे नुकसान अजूनही भरून निघालेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोकं आक्रोश करत आहेत. अनेक दिवस लोकांना पीठ मिळाले नाही. पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत.
एका व्हिडिओमध्ये एक पोलिस हातात एके-47 घेऊन पिठाच्या गोण्यांचे रक्षण करत आहे. नुकतीच शरीफ मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आधी ऊर्जा संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक मोकळ्या आकाशाखाली भर उन्हात झाली.