Pakistan: कुणी शिक्षण देतं का शिक्षण! पाकिस्तानात कोट्यावधी मुलांना प्राथमिक शिक्षणही नाही
शाळाबाह्य मुलांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत पाकिस्तानमध्ये सध्या 5-16 वयोगटातील अंदाजे 22.8 दशलक्ष मुलांसह जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Pakistan: पाकिस्तान सध्या शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. सध्या, शाळाबाह्य मुलांची ‘आउट ऑफ स्कुल चिल्ड्रेन’च्या अहवालानुसार (OOSC) सर्वाधिक संख्या असलेला पाकिस्तान हा जगातील दुसरा देश आहे. पाकिस्तानात बऱ्याच भागात मुलांना शिकण्याची इच्छा आहे मात्र शिक्षणाची (education) कुठलीच सोया नसल्याने मुलं वाम मार्गाकडे वळत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानात प्राथमिक शिक्षणही न मिळेलेल्या मुलांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. शाळाबाह्य मुलांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत पाकिस्तानमध्ये सध्या 5-16 वयोगटातील अंदाजे 22.8 दशलक्ष मुलांसह जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानमध्ये ही संख्या या वयोगटातील एकूण लोकसंख्येच्या 44 टक्के आहे. 5-9 वयोगटातील 5 दशलक्ष मुलं शाळांमध्ये नोंदणीकृत नाहीत आणि प्राथमिक शाळेच्या वयानंतर, शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या दुप्पट होते. आकडेवारीनुसार, 10-14 वर्षे वयोगटातील 11.4 दशलक्ष मुलांना प्राथमिक शिक्षणही मिळत नाही.
शैक्षणिक बजेटमध्ये 4 टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट
लिंग, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि भौगोलिक स्थितीच्या आधारे असमानता या आकडेवारीत लक्षणीय आहे. सिंधमधील 52 टक्के गरीब मुलं शाळाबाह्य आहेत, तर 58 टक्के मुली आहेत. बलुचिस्तानमध्ये 78 टक्के मुली शाळाबाह्य आहेत. प्राथमिक स्तरावर सुमारे 10.7 दशलक्ष मुलं आणि 8.6 दशलक्ष मुली आणि माध्यमिक स्तरावर 3.6 दशलक्ष मुलं आणि 2.8 दशलक्ष मुली नोंदणीकृत आहेत. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने एकूण जीडीपीच्या 2.8 टक्क्यांनी शैक्षणिक बजेट वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते पुरेसे नाही. सध्या बजेटमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.