पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली, इम्रान खानच्या मंत्र्याने पाकला उघडं पाडलं

पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी याने पाकिस्तानी संसदेत भारतात झालेल्या पुलवामा हल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कबूल केले आहे. (Pakistan Federal Minister Fawad Choudhari admit role in Pulwama Terror attack)

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली, इम्रान खानच्या मंत्र्याने पाकला उघडं पाडलं
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 10:07 AM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी संसदेत भारतात झालेल्या पुलवामा हल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कबूल केले आहे. पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्वातील सरकारचे यश असल्याचे चौधरींनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हटले. (Pakistan Federal Minister Fawad Choudhari admit role in Pulwama Terror attack)

पाकिस्तानला पंतप्रधान इमरान खान यांच्याबद्दल आदर असला पाहिजे कारण आपल्या देशाने भारताच्या भागात घुसून त्यांच्यावर हल्ला केला आहे, असं फवाद चौधरी या मंत्र्याने म्हटले आहे. पाकच्या नॅशनल असेंब्लीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तानी मुस्लीम लीगच्या सादिक खान यांनी कॅप्टन अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल केलेल्या वक्तव्याला फवाद खान उत्तर देत होते.

मागील वर्षी 14 फेब्रुवारी 2019 ला  सीआरपीएफच्या 78 बसेसच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. 78 बसेसमधून सुमारे 2500 जवान प्रवास करत होते.  सीआपीएफच्या 78 पैकी एका बसला स्फोटकांनी भरलेले चार चाकी वाहन धडकले होते.  यामध्ये 40 जवानांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटेनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तान सुरुवातीपासून पुलवामा हल्ल्याची जबाबदारी नाकारत होता.

पुलवामा घटनेचा बदला एअर स्ट्राईकने

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण स्थळांवर एअर स्ट्राईक करुन घेतला होता. यानंतर भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनच्या यादीतून वगळले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील सर्व देशांनी भारताला समर्थन देण्याची भूमिका घेतली होती.

संबंधित बातम्या :

Breaking | पुलवामाच्या काकापोरा भागात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jammu Kashmir| पुलवामात पुनरावृत्ती टळली, तब्बल 20 किलो आयईडी भरलेली कार निकामी, सुरक्षा यंत्रणेला मोठं यश

(Pakistan Federal Minister Fawad Choudhari admit role in Pulwama Terror attack)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.