पाकिस्तानातील परिस्थिती भयावह; पुरामुळे उपासमारीची वेळ; 1200 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे आता मृतांचा आकडा वाढला असून तो आता 1200 च्या पुढे गेला आहे. पाकिस्तानमध्ये अजूनही अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली असून येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पाकिस्तानातील परिस्थिती भयावह; पुरामुळे उपासमारीची वेळ; 1200 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 7:41 AM

नवी दिल्लीः पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्यात मृत झालेल्या नागरिकांचा आकडा आता 1200 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील (Pakistan Heavy Rain) परिस्थिती बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावं पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या काळात इतर देशांतून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जात आहे. पूरग्रस्तांच्या (Flood) मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीतून 9 आणि उझबेकिस्तानमधून पहिले विमान शुक्रवारी रात्री दाखल झाले आहे. पाकिस्तानातील अतिवृष्टीचा फटका 30 लाखांच्या (30 Lakhs) वर नागरिकांना बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले की, पाकिस्तानातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 1208 नागरिकांना आपला जीव (1208 Death) गमवावा लागला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाकडून मृतांचा आकडा जाहीर करण्यात आल्यानंतर त्यामध्ये 416 मुले आणि 244 महिला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर पुरामुळे 6082 लोकं जखमी झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

तीन दशकांतील हा सर्वाधिक पाऊस असल्याने आणि हिमनद्या वितळल्यामुळे देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गिलगिट बाल्टिस्तानला भेट दिल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पुरामुळे झालेल्या जीवितहानीमुळे आपल्याला खूप दुःख झाले असून देशभर विध्वंस झाला आहे. तुम्ही कुठेही पाहिला तरी त्यामध्ये तुम्हाला विध्वंसाशिवाय काहीच दिसणार नाही.

इतर देशांमधून येणारी मदत पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्र्यांलयाकडून सांगण्यात आले आहे की, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीतून मदत सामग्रीसह विमानं दाखल झाली आहेत. तर त्याचवेळी तुर्कीकडून ट्रेनमधून पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्यात येत आहे.

पावसामुळे 10 अब्ज डॉलरचे नुकसान

पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाचे सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या आठवड्याच्या प्रारंभी पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रांनी संयुक्तपणे सांगण्यात आले होते की, या वाईट परिस्थितीमध्ये मोठी मदत उभी केली जाईल. पाकिस्तानातील अतिवृष्टीमुळे 3.3 दशलक्ष लोकांना या दुर्घटनेचा फटका बसला आहे. त्याचबरोबर 10 लाखांहून अधिक घरांचे नुकसानही झाले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.