Pakistan floods: पाकिस्तानात पुरामुळे हाहाकार; 1 हजार जणांचा बळी, लाखो लोकं बेघर; पशूधनासह दिवस रात्र महामार्गावरच…
पाकिस्तानात झालेल्या या प्रचंड पावसामुळे आणि पुरामुळे गेल्या काही आठवड्यांपासून 30 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पाकिस्तानवर ही मोठी आपत्ती आली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
लाहोरः पाकिस्तानात सुरू असलेल्या मुसळधार (Pakistan Heavy Rains) पावसामुळे पाकिस्तानातील अनेक नागरिकांना बेघर होण्याची वेळ आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वाच्या उत्तरेकडील प्रातांमध्ये (khyber pakhtunkhwachaya north) मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्या परिसरातील नद्यांना महापूर आला असून अनेक पूल उद्धध्वस्त झाले आहेत, तर नदीकाठी असणाऱ्या अनेक गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने हजारो कुटुंबं बेघर झाले असून 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांचा या पावसात बळी गेला आहे. खैबर पख्तुनख्वाच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसामुळे अचानक पूर परिस्थिती (Pakistan floods) निर्माण झाली आहे. अतिवृष्टी झाल्याने काबुल नदीला पूर आला आहे, त्यामुळे नदी पात्राबाहेर जाऊन अनेक पूल उद्धध्वस्त झाले आहेत, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाकिस्तानातील चारसड्डा जिल्ह्यातील डाउनस्ट्रीम, नदीकाठी असणाऱ्या गावांना महापुराचा तडाका बसणार असल्याने सुमारे 1,80,000 लोकांना त्यांच्या गावातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Horrifying footage from S. #Pakistan today of entire building washed away by floods. Over 935 people killed, more than 33 million affected, worst natural disaster for country in decades: pic.twitter.com/aO6ZMlQycf
— Joyce Karam (@Joyce_Karam) August 26, 2022
नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरणार असल्याने अनेक गावातील अनेक नागरिकांनी आपल्या पशूधनासह महामार्गावरच रात्र काढत आहेत.
आठवड्यात 30 लाख नागरिकांना फटका
पाकिस्तानात झालेल्या या प्रचंड पावसामुळे आणि पुरामुळे गेल्या काही आठवड्यांपासून 30 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. तर 1 हजारपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानवर ही मोठी आपत्ती आली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
Pakistan was suffering from massive economic and political crises-unprecedented flood has made country’s situation much worse. A large hotel building going under the flood water. pic.twitter.com/GuqcJgZeec
— Ashok Swain (@ashoswai) August 26, 2022
लष्करांकडून मदतकार्य सुरू
पाकिस्तानातील नागरिकांना पूर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने मदत कार्य चालू केले असून लष्करांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पूर परिस्थितीबाबत पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी शनिवारी दक्षिणेकडील बलुचिस्तान प्रांताला भेट दिली असून या भागातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे.
The worst flood ever in Pakistan happening right now. 33 mil people affected. 784% above normal rainfall.
This video is shocking. Watch the buildings getting taken out.
— Wall Street Silver (@WallStreetSilv) August 27, 2022
आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीसाठी आवाहन
लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील अनेक लोकं पुरात अडकलेली आहेत, त्यांना कोणतीही मदत पोहचवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असल्याने पाकिस्तानी नेत्यांकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे मानवी वस्त्यांना मोठा फटका बसला असल्याने तुर्कीकडून बचावकार्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तानवर आर्थिक संकट
अफगाणिस्तानमध्येही पुराचा मोठा फटका बसला आहे, पुरामुळे अफगाणिस्तानमध्ये 192 पेक्षा नागरिकांचा जीव गेला आहे. तर हजारो पशुधनांचा मृत्यू झाला असून 1.7 दशलक्ष फळझाडे नष्ट झाली आहेत.त्यामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाचे उपसंचालक शराफुद्देन मुस्लिम यांच्याकडूनही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, आम्ही मानवतावादी संस्था, संघटना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या संस्थांनाही आम्ही मदतीची अपेक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले.