पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची हत्या; टार्गेट किलिंगमध्ये डोक्यात गोळी झाडली…

या महिन्याच्या सुरुवातीलाही याच प्रकारची घटना घडली होती. यावेळी धार्मिक विद्वान मौलाना अब्दुल कय्युम सुफी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची हत्या; टार्गेट किलिंगमध्ये डोक्यात गोळी झाडली...
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:26 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानातील कराचीमध्ये दोन डॉक्टरांवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. यामधील एका डॉक्टरचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात हिंदू नेत्रचिकित्सक डॉ. बिरबल जननी यांचा मृत्यू झाला असून आणखी एक महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. कुर्तुल ऐन असे या महिला डॉक्टरचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना कराचीतील गार्डन लियारी एक्स्प्रेस वे येथे झाल्याचे सांगण्यात आले आहे. येथे हल्लेखोरांनी एका वाहनावर गोळीबार केला ज्यामध्ये एका प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सकाचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला डॉक्टर जखमी झाली आहे.

महिला डॉक्टर कुर्तुल ऐन यांच्या खांद्याला गोळी लागली असून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर त्याचवेळी डॉ.जननी यांचा मृतदेहही पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टार्गेट किलिंगची घटना आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार रामास्वामी परिसरातून जात असताना गार्डन पोलीस स्टेशनजवळील एका हॉलजवळ हल्लेखोरांनी डॉक्टरांवर हल्ला केला. कराचीमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाही याच प्रकारची घटना घडली होती. यावेळी धार्मिक विद्वान मौलाना अब्दुल कय्युम सुफी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर ब्लॉक 9 भागात मौलाना अब्दुल कय्युम सुफी यांना लक्ष्य करण्यात आले होते. ते पाकिस्तान उलेमा असोसिएशनचे सदस्यही होते.

फजरची नमाज अदा करून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. ते जामिया मस्जिद मुहम्मदिया येथील नूरानी इस्लामिक सेंटरचे प्रमुखही होते. याशिवाय आणखी एक धार्मिक नेता सलीम खत्री यांचीही हत्या झाली आहे.

कराचीतील बिलाल कॉलनीजवळ दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर फेब्रुवारीमध्ये, फेडरेशन ऑफ प्रायव्हेट स्कूलचे उपाध्यक्ष सय्यद खालिद रझा यांची कराचीमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती अशी माहिती तेथील पोलिसांनी दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.