Pakistan Inflation: ‘या’ दहा जिवनाश्यक वस्तूंसाठी पाकिस्तानची जनता लाचार, शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय?

भारतातील गल्लीबोळातल्या दुकानातही जी वस्तू सहज मिळते, त्यांच्यासाठी पाकिस्तानात लोकं मरायला तयार आहेत.

Pakistan Inflation: 'या' दहा जिवनाश्यक वस्तूंसाठी पाकिस्तानची जनता लाचार, शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय?
पाकिस्तानात महागाईImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 2:45 PM

कराची, पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसंदिवस बिकट होत चालली आहे (Pakistan Inflation). लोकांना भाकरीसाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. पाकिस्तानात अनेकांना एकवेळच्या जेवणाची सोय करने देखील कठीण झाले आहे,  तर दुसरीकडे लोकं इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठीही हवालदिल झाल्याचे चित्र आहे. भारतातील गल्लीबोळातल्या दुकानातही जी वस्तू सहज मिळते, त्यांच्यासाठी लोकं मरायला तयार आहेत पाकिस्तान जे अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे.  पीठ, दूध, तांदळापासून ते चिकन, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेलपर्यंत (Petrol And LPG in Pakistan) सर्वच लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पाकिस्तानातील महागाईची स्थिती अशी आहे की, महागाईचा दर 24.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवाढीमुळे लोक अन्नधान्यावर अवलंबून आहेत. अनेक प्रांतातील शहरांमध्ये लोकं एलपीजीशिवाय राहत आहेत आणि जिथे गॅसही उपलब्ध आहे, तिथे सिलिंडरचे भाव गगणाला भिडले आहे.

पाकिस्तानात पिठाचा दुष्काळ

जीवनावश्यक वस्तूंच्या यादीवर नजर टाकली तर देशात गव्हाच्या तुटवड्याने मोठे रूप धारण केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ दाखवतात की, लोकं पिठाच्या पोत्यासाठी कसे मरायला तयार आहेत. अहवालानुसार, इस्लामाबादमध्ये गव्हाचा दैनंदिन वापर प्रत्येकी 20 किलोच्या 38,000 पिशव्यांचा आहे, परंतु येथे कार्यरत असलेल्या 40 पिठाच्या गिरण्यांमधून 21,000 पिशव्यांचा पुरवठा केला जात आहे.

आता पीठाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानचे इंग्रजी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीच्या बाजारपेठेत पिठाची किंमत 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. 15 किलोची पिठाची पोती 2,250 रुपयांपर्यंत विकली जात आहे. लाहोरमध्येही पिठाचा भाव 145 रुपये किलोवर पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानची सरकारी तिजोरी झपाट्याने रिकामी होत आहे आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारने उचललेली सर्व पावले अपुरी ठरत आहेत. पिठाशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूंची यादी पाहिली, जी लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत, त्यातही मोहरीच्या तेलाचा तुटवडा आहे. दुकानात उपलब्ध असलेल्या साठ्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो मोहरीचे तेल 533 रुपये प्रतिलिटर दराने मिळते. याशिवाय दूध आणि तांदळाचाही तुटवडा आहे. दूध 150 रुपये लिटर आणि तांदूळ 147 रुपये किलो दराने विकले जात आहे.

 ताटातून चिकनही गायब झाले

पाकिस्तानमध्ये चिकनची सरासरी किंमत 384 रुपये प्रति किलो झाली आहे आता अनेक शहरांमध्ये ते 650 रुपये किलो दराने विकले जात आहे. डाळींचे भावही गगनाला भिडले आहेत. आर्थिक संकटात असताना कांदाही पाकिस्तानी जनतेला रडवण्याचे काम करत आहे. गेल्या वर्षी देशात अवघ्या 37 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 220 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले

देशाचा परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवरही देश अवलंबून आहे. श्रीलंकेप्रमाणे ते पेट्रोल-डिझेलची मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे दिसते. परिस्थिती अशी आहे की, इंधनाचा तुटवडा असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. आकडेवारीवर नजर टाकल्यास, सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानमध्ये डिझेलच्या किमतीत एका वर्षात 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 2022 च्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमतीत 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एलपीजी

पीठ-डाळ-तांदूळ असो वा पेट्रोल-डिझेल, या सगळ्यांसोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच एलपीजीचा तुटवडाही पाकिस्तानात अडचणीचे सर्वात मोठे कारण बनत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये लोकांना एलपीजीशिवाय जगावे लागत आहे. किमतींबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 10,000 पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

औषधांचा तुटवडा

पैशांच्या तुटवड्यासोबतच पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडाही जाणवू लागला आहे. लोकांना अत्यावश्यक औषधे मिळत नाहीत. विशेष म्हणजे भारतासह इतर देशांतून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा पाकिस्तानमध्ये केला जातो. मात्र सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे औषधांचा तुटवडाही जाणवू लागला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.