पाकव्याप्त काश्मिरी जनतेच्या संतापाचा फुटला बांध; जनता रस्त्यावर, सरकारी यंत्रणा, पोलिसांना केली पळता भूई थोडी

Alarm to Pakistan : पाकव्याप्ती काश्मीरमधील परिस्थिती पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.

पाकव्याप्त काश्मिरी जनतेच्या संतापाचा फुटला बांध; जनता रस्त्यावर, सरकारी यंत्रणा, पोलिसांना केली पळता भूई थोडी
पीओकेमध्ये तांडव, जनता रस्त्यावर, पोलिसांना दिला चोप
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 3:40 PM

भारतीय काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताकडे झुकली आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या इतक्या वर्षांच्या फसवणुकीविरोधात एल्गार पुकारला आहे. जनता रस्त्यावर आल्याने पाकिस्तान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. वीज संकट, महागाई आणि कराचा मोठा बोझ्याने जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला. राजधानी मुझफ्फराबादमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अनेक भागात त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांना पिटाळून लावण्यात आले. त्यांना पळता भूई थोडी झाली आहे.

PoK मध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शन

राजधानी मुझफ्फराबादमध्ये आंदोलकांनी उग्र प्रदर्शन केले. इतकेच नाही तर पाकव्याप्त दादियाल, मीरपूर, समाहनी, सेहंसा, रावलकोट, खुइरट्टा, तत्तापानी आणि हट्टियन बाला या भागातही जोरदार प्रदर्शन झाले. या सर्व ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. जनतेच्या रेट्यापुढे पोलिसांना पळ काढावा लागल. तर काही ठिकाणी आंदोलकांना काठ्यांचा प्रसाद भेटला.

हे सुद्धा वाचा

अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग

पाकिस्तान गेल्या 70 वर्षांहून अधिक काळापासून या भागात दादागिरी करत आहे. तिथल्या लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्याचा परिणाम पीओकेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीर संयुक्त जनता समितीने (JKJAAC) मुझफ्फराबादमध्ये बंदचे आयोजन केले होते. जनता रस्त्यावर येताच त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. उग्र प्रदर्शन सुरु झाल्यावर पोलिसांनी अश्रुधुराच गोळे सोडले आणि हवेत फायरिंग केले. पोलिसांनी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना पकडले. मंगला धरणाची वीज मोफत मिळावी आणि पिठावरील कर माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

पोलिसांना लाठ्यांचा प्रसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक भागात जनता रस्त्यावर उतरली आहे. अटकाव करणाऱ्या पोलिसांवर जनतेचा राग निघाला. याविषयीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात लोक पोलिसांच्या काठ्या हिसकावून त्यांनाच फटकावत असल्याचे दिसत आहे. जनतेचे रौद्र रुप पाहून अनेकांनी काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा पण देण्यात आल्या. वाढीव कुमक आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांना अटक केली आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....