नवी दिल्लीः पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत 30 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात 100 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचवेळी या स्फोटात 221 जण जखमी झाले होते. पोलिसांना लक्ष्य करून हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. हे विशेष. 300 ते 400 पोलीस दुपारच्या नमाजासाठी जमले होते तेव्हा हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 100 पैकी 97 पोलीस होते. त्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीला सांगितले की, मृतांमध्ये 97 पोलीस अधिकारी आणि तीन नागरिकांचा समावेश होता. त्यामधील 27 जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पेशावर हल्लावरून म्हटले आहे की, आपला शेजारी देश आपल्या कृत्यांपासून मागे हटणार नाही.
तसेच ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारत किंवा इस्रायलमध्ये नमाजच्या वेळी नमाजीही शहीद होत नाहीत, मात्र पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे पेशावरमध्ये झालेल्या रक्तपाताला नेमके जबाबदार कोण असा सवाल आता आसिफ यांनी उपस्थित केला आहे.
या हल्ल्याविषयी सांगताना ते म्हणाले की, आपल्याला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आपण कुठे उभे आहोत हे पाहण्याची गरज आहे.
या लोकांना का आणले? या हल्ल्याचा जो पर्यंत निषेध केला जात नाही. देशाकडून दहशतवादाविरोधात एकजूट होत नाही तोपर्यंत हा लढा द्यावाच लागणार आहे असंही त्यांनी म्हटले आहे. हे झालेले कोणत्याही विशिष्ट पंथाचे युद्ध नाही, तर ते पाकिस्तानी राष्ट्राचे युद्ध आहे.
पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की, दहशतवादाविरुद्ध युद्ध 2010-2017 या काळात लढले गेले.
पीपीपीच्या कार्यकाळात स्वातपासून सुरू झालेले हे युद्ध पीएमएल-एनच्या आधीच्या कार्यकाळात संपले आणि कराचीपासून स्वातपर्यंत देशात शांतता प्रस्थापित झाली.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखले जाते, त्यांनी आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि सांगितले की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुरासानी याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केला आहे.
स्फोटाच्या ठिकाणाहून संशयित आत्मघातकी हल्लेखोराचे शीर जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद एजन्सी येथील सलीम खान यांचा मुलगा मोहम्मद अयाज (वय 37) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.