Pakistan : इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, दहशतवादी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर एका न्यायाधीश आणि दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत बोलताना इम्रान खान यांनी उच्च पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांना धमकी दिली होती.

Pakistan : इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, दहशतवादी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक
Pakistan Former PM Imran khan
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 8:40 AM

नवी दिल्लीः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Pakistan Prime Minister Imran Khan) सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना लवकरच अटक (Arrest) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर एका न्यायाधीश आणि दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत बोलताना इम्रान खान यांनी उच्च पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांना धमकी दिली होती. गेल्या आठवड्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक (Arrested on charges of sedition) करण्यात आलेला आपला सहकारी शाहबाज गिल याच्याशी झालेल्या वागणुकीवरून त्यांनी हा इशारा दिला होता.

इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी

पाकिस्तानातील मीडिया वॉचडॉगने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान खान यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण करण्यावर सर्व उपग्रह दूरचित्रवाणी आणि चॅनेलवर तात्काळ बंदी घालण्यास सांगितली होती. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी (पेमरा) ने शनिवारी स्पष्ट केले की, वारंवार सूचना देऊनही सरकारी नियमांविरूद्ध या इम्रान खान यांच्यासारख्या भाषण प्रसारित करण्यावर बंदी घालूनही प्रसारित करण्यात आले आहे.

PEMRA ने मोठी कारवाई केली

यापूर्वी पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाकडून (PEMRA) इम्रान खान यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली होती. पेमराने सॅटेलाईट टीव्ही चॅनलवरील त्यांच्या थेट भाषणावर बंदी घातली होती. यासोबतच त्यांचे रेकॉर्ड केलेले भाषण आणि निवेदनही तपासून प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

इम्रानच्या भाषणावर कारवाई

पाकिस्तानातील इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाकडून जाहीर केलेल्या आदेशात म्हणण्यात आले होते की, ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान हे सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमध्ये आणि भाषणांमध्ये नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यांची अशी भाषणे देशातील शांतता धोक्यात आणणारी आहेत असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कलम 19 चे उल्लंघन केले असल्याचे  मानले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.