Imran Khan Government : राजीनामा देण्याआधी इम्रान खान यांच्या तीन अटी, शाहबाज शरीफ यांच्या पंतप्रधान बनण्यालाही विरोध
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात (Pakistan Supreme Court) या प्रकरणावर सुनवाणी सुरू आहे. इम्रान खान यांच्यासाठी ही जणू अग्निपरीक्षाच आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्यापूर्वी तीन अटी ठेवल्या आहेत. पद सोडल्यानंतर अटक करू नये, ही पहिली अट त्यांनी ठवली आहे.
पाकिस्तान : पाकिस्तानात सध्या इम्रान खान (Imran Khan) यांचं सरकार जायच्या मार्गावर आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात (Pakistan Supreme Court) या प्रकरणावर सुनवाणी सुरू आहे. इम्रान खान यांच्यासाठी ही जणू अग्निपरीक्षाच आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्यापूर्वी तीन अटी ठेवल्या आहेत. पद सोडल्यानंतर अटक करू नये, ही पहिली अट त्यांनी ठवली आहे. तसेच शाहबाज शरीफ (Shahbaj Sharif) यांच्याऐवजी अन्य कोणाला तरी पंतप्रधान करावे, ही दुसरी अट ठेवी आहे. तसेच तिसर्या अटीत त्यांनी पद सोडल्यानंतर नॅब अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल करू नये, असे म्हटले आहे. जिओ न्यूजच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. इम्रान खान यांच्या दोन मंत्र्यांनी सोशल मीडिया ट्विटरवर त्यांचे बायो बदलले आहेत. निर्णय होण्याआधीच त्यांनी नावापुढे माजी मंत्री असे लावले आहे. इम्रान सरकारमध्ये माहिती मंत्री फवाद चौधरी आणि परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी माजी मंत्री अशी त्यांची प्रोफाईल बनवल्याची माहिती समोर आली आहे.
अध्यक्षांचा मतदान करण्यास नकार
पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यास स्पीकर असद कैसर यांनी नकार दिला आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान करून मी इम्रान खान यांच्याशी फसवणूक करू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच यासाठी मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी भारतातबाबतही अनेक खळबळजनक दावे केले आहे. त्यात पाकिस्तानचे नवाज शरीफ जीव वाचवण्यासाठी मोदींना लपून छपून भेटत असल्याचाही दावा केला आहे.
मागच्या सुनवाणीवेळी काय झालं?
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आज रात्री विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदानापूर्वी पीटीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. इम्रान सरकारला झटका देताना सुप्रीम कोर्टाने डेप्युटी स्पीकरचा निर्णय रद्द केला आणि नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून इम्रान खान यांचा सरकार वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आता सरकार वाचण्याची आशा अनेक मंत्र्यांनी सोडली आहे.