पुरावे द्या, कारवाई करु, पण युद्ध केल्यास उत्तर देऊ: इम्रान खान

इस्लामाबाद: जम्मू काश्मीरमधील पुलवामा (Pulwama attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर छी थू होत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “माझं वक्तव्य भारत सरकारसाठी आहे. भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे […]

पुरावे द्या, कारवाई करु, पण युद्ध केल्यास उत्तर देऊ: इम्रान खान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इस्लामाबाद: जम्मू काश्मीरमधील पुलवामा (Pulwama attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर छी थू होत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

“माझं वक्तव्य भारत सरकारसाठी आहे. भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे द्या कारवाईची आम्ही हमी देतो. हल्ला करुन पाकिस्तानला काय मिळेल? काश्मीरमधील हल्ल्यांना दोष देण्यापेक्षा तो प्रश्न सोडवू”, असं भावनिक आवाहन इम्रान खान यांनी केलं.

आम्ही दहशतवादाला थार देतोय, याचे पुरावे द्या, मग कारवाईची हमी देतो. आम्ही स्थैर्याकडे जातोय, मग हल्ला का करु? पुलवामा हल्ला करुन आम्हाला काय फायदा आहे? – इम्रान खान

भारतात सध्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे पुलवामाचा मुद्दा उचलून तुम्हाला फायदा होईल. मात्र तुम्ही युद्ध केलं तर ते युद्ध आम्ही संपवू, असा इशारा इम्रान खान यांनी दिल

पाकिस्तानचा बदला घ्यायला पाहिजे, असं मी वारंवार ऐकतोय, पण जगातील कोणता कायदा लोकांना अशाप्रकारे न्यायाधीश बनवण्याचा अधिकार देतो? असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला.

आम्हाला माहित आहे युद्ध सुरु करणं सोपं असतं, मात्र युद्ध सुरु करणं माणसांच्या हातात असतं, युद्ध थांबवणं माणसांच्या हातात नसतं. तुमचं निवडणुकीचं वर्ष आहे, जर तुम्ही समजत असाल की पाकिस्तानवर हल्ला करु, तर पाकिस्तानही विचार करणार नाही, उत्तर देईल, असा इशारा इम्रान खान यांनी दिला.

काश्मीरमधील तरुण अशा टोकाला का गेले आहेत, जिथे त्यांना जीवाचीही पर्वा नाही, भारताने याबाबत विचार करायला हवा, असं इम्रान खान म्हणाले. मिलिट्री हा पर्याय नाही. जोरजबरदस्तीने काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. चर्चा हाच त्याला पर्याय आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 17 वर्षांपासून धगधग आहे, तिथे मिलिट्री काहीही करु शकली नाही, त्यामुळे काश्मीरच्या शांततेसाठी मिलिट्री हा पर्याय असू शकत नाही असं इम्रान खान यांनी नमूद केलं.

दहशतावीद हल्ल्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे.जवळपास 70 हजार पाकिस्तानी नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत. शिवाय 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानला दोष देणं बंद करा, असं इम्रान खान म्हणाले.

VIDEO:

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.