Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Political Crisis : अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी, शहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा

आता एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान (Imran Khan) यांना हाकलण्यात आले आहे. इम्रान खान हे पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार पडले आहे.

Pakistan Political Crisis : अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी, शहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा
इम्रान खान सरकार पडलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 1:21 AM

इस्लामाबाद : पाकिस्तान गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानाच मोठा पॉलिटिकल राडा सुरू होता (Pakistan Political Crisis). त्यावर आता एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान (Imran Khan) यांना हाकलण्यात आले आहे. इम्रान खान हे पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार पडले आहे. आता शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील, अशी शक्यता आहे. तशी घोषणा लवकरच होईल. सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीवेळीच इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करावेच लागले असे ठणकावले होते. आणि त्यानंतर आज बहुमतासाठी पाकिस्तानात मतदान पार पडले आहे. जगाचे लक्ष या घडामोडींकडे लागले होते. सर्व प्रयत्न करून, हा सत्तेचा खेळ शेवटच्या चेंडुपर्यंत खेचूनही इम्रान खान यांचा शेवटी नाईलाज झाल्याने इम्रान खान पंतप्रधानाच्या खुर्चीवरून आऊट झाले आहेत.

कायम लढा देत राहीन-इम्रान खान

इम्रान खान हे सध्या देशही सोडून जाऊ शकत नाहीत, असे सागण्यात आले आहे. व्यवस्थेविरुद्ध लढणारा मी एकमेव माणूस आहे, कधीही हार मानणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मला तुरुंगात जावे लागेल पण मी माझ्या देशासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन, असे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर परकीय षड्यंत्र मी यशस्वी होऊ देणार नाही असेही ते म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक लाहोरमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. मतदान प्रक्रिया सुरू करण्याआधी इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य पाकिस्तान नॅशनल असेंब्ली सोडून बाहेर पडले.

मतदानाआधी अध्यक्षांचा राजीनामा

पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट

पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठरावावरील मतदानापूर्वी स्पीकर असद कैसर आणि डेप्युटी स्पीकर यांनी राजीनामा दिला आहे. आपण अविश्वास प्रस्तावावर मतदान करणार नाही यावर स्पीकर आधीच ठाम होते. संसदेत बदललेले राजकीय चित्र पाहता इस्लामाबादकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय इस्लामाबादमधील सर्व रुग्णालयांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांना इस्लामाबादमध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Kolhapur By Election : ‘तुमच्यात देण्याची दानत नाही, तुम्ही फक्त घरं भरली’, कोल्हापुरातून फडणवीसांचा हल्लाबोल

पवारांच्या घरावरील राड्यानंतर जयंत पाटलांचं प्रवीण दरेकरांकडे बोट? कुणाचं नाव घेत नसल्याचंही आवर्जुन सांगितलं!

Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले.
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार.