Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Political Crisis : इम्रान खान सरकारने हार मानली? फवाद चौधरी आणि शाह महमुद कुरैशींनी बदलला ट्विटर बायो!

इम्रान खान सरकारमधील फवाद चौधरी यांनी ट्विटरवरील आपलं प्रोफाईल बदललं आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलवर माजी मंत्री लिहिलं आहे. फवाद चौधरी हे इम्रान खान सरकारमध्ये सूचना मंत्री होते. फवाद चौधरी यांनी आपल्या ट्विटरवरील बायो बदलल्यानंतर शाह मेहमुद कुरेशी यांनीही आपल्या ट्विटरवरील बायो बदललाय.

Pakistan Political Crisis : इम्रान खान सरकारने हार मानली? फवाद चौधरी आणि शाह महमुद कुरैशींनी बदलला ट्विटर बायो!
इम्रान खान सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर आज मतदानImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 7:17 PM

मुंबई : पाकिस्तानातील (Pakistan) राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, इम्रान खान (Imran Khan) सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर (NO Confidence Motion) आज मतदान होणार आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार राहणार की नाही याचा फैसला आज होणार आहे. पाकिस्तानच्या संसदेत एकूण खासदारांची संख्या 342 आहे. म्हणजेच फ्लोर टेस्ट पास होण्यासाठी इ्म्रान खान यांना 172 मतं मिळवावी लागणार आहेत. मात्र, सद्यस्थितीत इम्रान खान यांना 142 खासदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधी पक्षांसोबत 199 खासदार असल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान, अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच इम्रान खान सरकारनं हार मानल्याचं पाहायला मिळत आहे.

इम्रान खान सरकारमधील फवाद चौधरी यांनी ट्विटरवरील आपलं प्रोफाईल बदललं आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलवर माजी मंत्री लिहिलं आहे. फवाद चौधरी हे इम्रान खान सरकारमध्ये सूचना मंत्री होते. फवाद चौधरी यांनी आपल्या ट्विटरवरील बायो बदलल्यानंतर शाह मेहमुद कुरेशी यांनीही आपल्या ट्विटरवरील बायो बदललाय. शाह मेहमुद कुरेशी यांनी ट्विटरवर माजी परराष्ट्र मंत्री म्हटलंय.

Fawad Husain

फवाज चौधरी यांनी ट्विटरवरीय बायो बदलला

Shah Mahmood Qureshi

शाह मेहमुद कुरेशी यांनी ट्विटरवरील बायो बदलला

शाह महमुद कुरैशींचं मोठं वक्तव्य

शाह महमूद कुरैशी यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही आज आहोत, उद्या नसू. लोकांनी निवडून आलेल्या सरकारविरोधात असं होतं असा कोणता देश आहे, असं कुरैशी म्हणाले. कुरैशी यांच्या या विधानाने इम्रान खान यांच्या सरकारचा सत्तेवरून पाय उतार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, आज सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असूनही इम्रान खान हे असेंबलीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तीन तास भाषण करण्याचं फर्मान

दरम्यान जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, संसद सत्रामध्ये व्होटिंग घेण्यास जाणूनबुजून उशिर केला जात आहे. पीटीआयचे मंत्री आपले भाषण लांबवतील, असा दावाही केला जात आहे. हामिद मीर म्हणाले की, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी ब्रेक नंतर त्यांचं भाषण सुरू ठेवतील. कमीत कमी तीन तास भाषण करावं, असा आदेश पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याचा दावा, मीर यांनी केला आहे.

इतर बातम्या :

Video| भारताचे लोक स्वाभिमानी कोणतीही महासत्ता भारतावर निर्बंध घालू शकत नाही; मात्र आरएसएसच्या विचारसणीमुळे आपण निराश – इमरान खान

Political Crisis in Pakistan : तर भारतात चालते व्हा, नवाज शरीफच्या मुलीनं इम्रान खानला सुनावलं, इम्रान म्हणतात, भारतीय खुद्दार ‘कौम’ !

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.