Pakistan power crisis : पाकिस्तानात वीज, इंधनाचा भीषण तुटवडा, रात्री दहानंतर लग्नसमारंभांवर बंदी

पाकिस्तानमध्ये इंधन आणि विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना दिवसातून कित्येक तास भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.

Pakistan power crisis : पाकिस्तानात वीज, इंधनाचा भीषण तुटवडा, रात्री दहानंतर लग्नसमारंभांवर बंदी
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:32 PM

आता श्रीलंकेनंतर पाकिस्तान (Pakistan) देखील मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. नव्या सरकारला देखील पाकिस्तानची आर्थिक घडी बसवण्यात अद्याप यश आलेलं नाही. पाकिस्तानमध्ये इंधन (Fuel Crisis) आणि विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना दिवसातून कित्येक तास भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. आद्याप पावसाळा सुरू झालेला नाही. उष्णतेमुळे विजेच्या (Electricity) मागणीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. मात्र विजेचा पुरवठा कमी पडत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. सरकारकडून विजेचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विजेचा जास्त वापर होऊ नये यासाठी रात्री दहानंतर विवाह समारंभासारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महागाईच्या मुद्द्यावरच पाकिस्तानमधील इमरान खान सरकार कोसळले होते. मात्र त्यांच्या जागी सत्तेत आलेल्या नव्या सरकारला देखील महागाई, वीज आणि इंधन संकटावर अद्याप मार्ग काढता आलेला नाही.

आठ जूनपासून नवे आदेश लागू

सध्या पाकिस्तानमध्ये भीषण वीजटंचाई आहे. नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागत असल्यामुळे इस्लामाबादमध्ये रात्री दहानंतर लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. आठ जूनपासून हे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांना केवळ एकच डिश सर्व्ह करण्याची परवानगी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार लग्न समारंभावर ही बंधने आणली गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना

एवढंच नाही तर बाजारांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्री साडेआठनंतर बाजरपेठा सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. विजेची बचत करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. तसेच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम शक्य आहे. त्यांनी वर्क फॉर्म होम करावे असे आदेश देखील सरकारने दिले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या एकूण 22,000 मेगा वॅट विजेचे उत्पादन होत आहे. मात्र पाकिस्तानला सध्या एकूण 26 हजार मेगा वॅट विजेची गरज आहे. दररोज गरजेपेक्षा विजेचे उत्पादन चार हजार मेगा व्हॅटने कमी होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.