इम्रान खान यांचं अमेरिकेतही काश्मीर प्रश्नाचं गाऱ्हाणं, डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थीसाठी तयार
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. यावेळी इम्रान खान यांनी अमेरिकेतही ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नावर लक्ष द्या असे गाऱ्हाणे घातले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. यावेळी इम्रान खान यांनी अमेरिकेतही ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नावर लक्ष द्या असे गाऱ्हाणे घातले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचे सांगितले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ही पहिली भेट होती. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. इतकंच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नी चर्चा केल्याचा दावा केला आहे. तसेच नरेंद्र मोदींनी काश्मीरचा वाद निवळण्यासाठी मदत करावी असेही मला सांगितले होते. त्यावेळी मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचा मोदींना सांगितले होते, असाही दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या भेटीदरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीकडे जगभरासह अनेक देशांचे लक्ष लागले होते.
ट्रम्प यांच्या भेटीनंतर उद्या 23 जुलैला इम्रान खान हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांची भेट घेणार आहे. या दरम्यान युएस इन्स्टीट्यूट ऑफ पीस यांनाही इमरान खान संबोधित करणार आहे.
दरम्यान शनिवारी (20 जुलै) इम्रान खान हे कतार एअरवेजच्या विमानाने अमेरिकेतील वॉशिंग्टनला पोहोचले. मात्र, या दरम्यान त्यांना मोठा अपमान सहन करावा लागला.
इम्रान खान अमेरिकेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कुठलाही नेता किंवा अधिकारी पोहोचला नाही. इतकंच नाही, तर तिथे कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. विमानतळावर इम्रान खान यांच्यासाठी कुठल्याही वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे इम्रान खान आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर लोकांना मेट्रोने त्यांच्या निवासस्थानापर्यंत (पाकिस्तान हाऊस) जावं लागलं.
US President Donald Trump says PM Narendra Modi has also asked him to help with “disputed Kashmir” region, he would “love to be a mediator”: Reuters pic.twitter.com/PcE7dnq4rr
— ANI (@ANI) July 22, 2019
इम्रान खान यांचा पहिला अमेरिका दौरा
इम्रान खान यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. इथे इम्रान खान हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील. यावेळी ते अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांविषयी अनेक मुद्यांवर चर्चा करतील. अमेरिका आणि अफगान तालिबानमधील तणावपूर्ण संबंध एका निर्णायक वळणावर पोहोचले असताना इम्रान खान आणि ट्रम्प यांच्यातील ही भेट होत आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. इम्रान खान हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरुन तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत.
#WATCH Washington DC: Pakistan PM Imran Khan and US President Donald Trump reply to journalists when asked on Kashmir. pic.twitter.com/UM51rbsIYF
— ANI (@ANI) July 22, 2019
इम्रान खानसोबत पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीदही अमेरिकेत आहेत. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी व्हाईट हाऊसला भेट दिली. त्यानंतर उद्या 23 जुलैला ते स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचीही भेट घेतील. त्यानंतर ते पाकिस्तानात परततील.
संबंधित बातम्या :
अमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं!