अटक होण्यापूर्वीची इम्रान खान यांच्या आयुष्यातील ‘ही’ एक ‘काळ रात्र’;समर्थकांना सांगितले, अच्छे दिन आनेवाले है…

इम्रान खान म्हणाले की, लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरावर झालेला हल्ला हा पीटीआयविरोधातील एका मोठ्या कटाचा भाग आहे. या हिंसाचारासाठी आमच्यावरही आरोप केले जात आहेत.

अटक होण्यापूर्वीची इम्रान खान यांच्या आयुष्यातील 'ही' एक 'काळ रात्र';समर्थकांना सांगितले, अच्छे दिन आनेवाले है...
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 11:39 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या समर्थकांना संबोधित केले आहे. त्यांनी सांगितले की, “गडद काळोखा” नंतर नेहमीच एक उज्ज्वल आणि रम्य पहाट असते. यावेळी त्यांनी अच्छे दिन आएंगे असंही अश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या अटकेबाबत आणि त्यांच्यावर सरकारने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या इतिहासात अशी वेळ कधीच पाहिली नाही, त्यामुळे आता या गोष्टीचा मला प्रचंड त्रास होतो आहे.

पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांनी पक्षाच्या महिला नेत्या शिरीन मजारी यांना पुन्हा अटक केल्याबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सरकारकडून अशी अत्यंत कृत्याचा त्यांनी निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे.

इम्रान खानने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या छळाची तुलना त्यांनी जर्मनीतील नाझींबरोबर केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधानांनी यावेळी सांगितले की, पीटीआय गेल्या 27 वर्षांपासून शांततापूर्ण निदर्शने करत आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आमच्या पक्षाला हिंसाचार का हवा असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केल आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, आम्हाला हिंसा नको आहे मात्र तिच हिंसा कुणाला तरी हवी आहे. सध्याच्या काळात पाकिस्तानातील सामाजिक स्थैर्य एवढे खाली घसरले आहे की, त्याची अवस्था वाईट आहे. तसेच, महिलांना ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे तशी वागणून यापूर्वीही कधी दिली नाही.

लष्कर आणि सरकारच्या कारवाईवर, इम्रान खान यांनी असा दावा केला की हे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कारण समर्थक आणि कार्यकर्ते घरातून बाहेर पडू नये यासाठी ही भीती निर्माण केली जात आहे.

इम्रान खान म्हणाले की, लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरावर झालेला हल्ला हा पीटीआयविरोधातील एका मोठ्या कटाचा भाग आहे. या हिंसाचारासाठी आमच्यावरही आरोप केले जात आहेत. मात्र त्यानंत झालेल्या तपासात त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही त्याचे पुरावे सापडले नाहीत. कॉर्प्स कमांडरच्या घरात आधीच लोक उपस्थित होते.

हे दुसरे तिसरे काही नसून आमच्या विरुद्धचे षडयंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकार निवडणुका घेण्यासही घाबरत आहे. त्यासाठी आम्ही चर्चेसाठीही तयार आहोत, मात्र त्यांनी आमच्याच नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. हा सर्व कट आमच्या विरोधात रचला असून हे सगळे पूर्वनियोजित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.