पाकिस्तानने अनेक दशकानंतर केली स्वदेशी क्षेपणास्राची यशस्वी चाचणी, भारताला मोठा धोका ?

इतके दिवस राजकीय उलथा पालथ आणि आर्थिक दिवाळखोरीच्या बातम्यांनी सतत चर्चेत असलेल्या आपल्या शेजारील देशाने अनेक दशकानंतर अचानक स्वदेशी बॅलेस्टीक मिसाईलची यशस्वी चाचणी केल्याने जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे हे मिसाईल आणि भारताला त्याचा किती धोका आहे पाहूयात...

पाकिस्तानने अनेक दशकानंतर केली स्वदेशी क्षेपणास्राची यशस्वी चाचणी, भारताला मोठा धोका ?
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 3:44 PM

भारत आणि पाकिस्तान यांचा संघर्ष कायमच धगघगत असतो. पाकिस्तानच्या निर्मितीपासून या दोन देशाचे शत्रूत्व कायम आहे. काश्मीर प्रश्नावरुन हे दोन देश कायम युद्धाच्या पावित्र्यात असतात. अशात चीनचा पाकिस्तानला वाढता पाठींबा भारताला कायम स्वरुपी धोका आहे. अशात आता पाकिस्तानने अनेक दशकांनंतर ३५० किलोमीटरपर्यंत मारा असणारे स्वदेशी शिप-लॉंच बॅलेस्टीक क्षेपणास्राची यशस्वी चाचणी केल्याने या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

भारताला पाकिस्तान आणि चीन सारखे शेजारी असल्याने कायम दक्ष राहावे लागत असताना आपला शेजारी पाकिस्तानने खतरनाक मिसाईलची यशस्वी चाचणी केलेली आहे. स्वदेशी शिप-लॉंच बॅलेस्टीक मिसाईल (SLBM) ३५० किमीपर्यंत अचूक मारा करु शकते. या खतरनाक मिसाईलला समुद्र आणि जमीन दोन्ही ठिकाणांहून डागता येते. ३५० किलोमीटरच्या पल्ल्यात भारताची अनेक शहरे येत असल्याने भारताला धोका निर्माण झालेला आहे. या क्षेपणास्र चाचण्या पाकिस्तानची सामरिक क्षमता मजबूत करण्यासाठी आणि भारतासोबत लष्करी संतुलन प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. तरीही भारतीय नौदल अशा प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आधी पासूनच सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

अनेक दशकांनी क्षेपणास्र विकसित केले

शेजारील देश पाकिस्तानने अनेक दशकानंतर स्वदेशी शिप-लॉंच बॅलेस्टीक क्षेपणास्राची यशस्वी चाचणी केली आहे. त्याची रेंज ३५० किलोमीटर पर्यंत आहे. याची मारकक्षमता पाहाता भारताचे पश्चिमी क्षेत्र आणि भारतीय नौदलाची जहाजांसाठी संभाव्य धोका बनलेला आहे. हे मिसाईल समुद्रात तैनात केलेल्या जहाजावरुन देखील डागले जाऊ शकते.समुद्र आणि जमिनीवर लक्ष्यांना हे टार्गेट करण्यास सक्षम आहे. याशिवाय जहाजावरुन लॉंच करता येणारी ही बॅलेस्टीक मिसाईल पाकिस्तानला युद्धस्थितीत दुसरा हल्ला करण्याची क्षमता प्रदान करत आहेत, भारतासाठी एक नवीन युद्धजन्य परिस्थितीतील आव्हान बनू शकते असे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

भारतासाठी संभाव्य धोका

पाकिस्तानाची नवीन मिसाईल भारतीय नौदलाची जहाजे, किनारपट्टीला टार्गेट करु शकते. अरब समुद्रातील भारतीय जहाजे आणि महत्वपूर्ण आर्थिक संपत्तीला धोका उत्पन्न होऊ शकतो. या क्षेपणास्रात अण्वस्र वाहण्याची देखील क्षमता असू शकते. त्यामुळे ही अधिक धोकादायक ठरू शकते. परंतू भारताकडे एस-४०० ट्रायम्फ सारखी अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. जी बॅलेस्टीक मिसाईलना रोखण्यासाठी समर्थ आहे. जर पाकिस्तानने काही धाडस केले तर त्याला इतके मोठे प्रत्युत्तर भारत देईल कि पुढील अनेक वर्षे त्याला जखम लक्षात राहील असे म्हटले जात आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.