एक मासा जाळ्यात अडकला, मच्छीमार झटक्यात लखपती बनला, वाचा नेमकं काय घडलं?

साजिद हाजी अबाबकर यांनी याविषयी माहिती देताना क्रोकर माशाची किंमत 86 लाखांपर्यंत पोहोचली होती,असंही सांगितलं. Fisherman Crocker

एक मासा जाळ्यात अडकला, मच्छीमार झटक्यात लखपती बनला, वाचा नेमकं काय घडलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:18 PM

नवी दिल्ली: एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो आणि त्याचं नशीब बदलून जातं. एक मच्छीमार मासेमारी करण्यासाठी गेला असता त्यावेळी त्याच्या जाळ्यात एक मासा फसला. मच्छीमाराला त्या माशाच्या विक्रीतून एक दोन लाख नव्हे तर तब्बल 72 लाख रुपये मिळालेत. मच्छीमाराला दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या क्रोकर (Crocker) प्रजातीचा मासा मिळाला होता. (Pakistani Fisherman life changed got seventy two lakh rupees from one Crocker fish auction)

हा मच्छीमार कुठला?

साजिद हाजी अबाबकर यांच्या बोटीतून मासेमारी सुरु होती. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार हा मासा पकडण्यात आला त्यावेळी वाहिद बलोच बोट चालवत होते. क्रोकर हा मासा दुर्मिळ समजला जातो. या माशाचा लिलाव करण्यात आला तेव्हा याची किंमत 86 लाखांपर्यंत पोहोचली होती.

क्रोकर माशावर 86 लाखापर्यंत बोली

साजिद हाजी अबाबकर यांनी याविषयी माहिती देताना क्रोकर माशाची किंमत 86 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र, ग्राहकांना सूट देण्याची परंपरा असल्यानं 72 लाख रुपयांना लिलाव अंतिम केल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानी जीवशास्त्रज्ञ अब्दुल रहीम बलोच यांनी क्रोकर माशाची मागणी चीन आणि यूरोपमध्ये सर्वाधिक असल्याचं सांगितलं.

मच्छीमारांमध्ये आनंद

पाकिस्तानी जीवशास्त्रज्ञ अब्दुल बलोच यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रोकर मासा हा त्याच्या मांसामुळे दुर्मिळ समजला जातो. मांसाचा वापर औषध आणि सर्जरी करताना केला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दुल हक नावाच्या मच्छीमाराला देखील क्रोकर मासा सापडला होता. त्यावेळी त्याची विक्री पाकिस्तानी चलनात 7 लाख 80 हजार रुपयांना झाली होती. क्रोकर मासा आढळल्यानं मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या:

Video | पिळदार देह, बलदंड भुजा, सोशल मीडियावर अनोख्या कांगारूची चर्चा, व्हिडीओ पाहाच

Video : लाडाच्या चिमणीचा रुबाबच न्यारा, स्केटिंगचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

झुम मिटींग सुरु असताना खासदाराने केली कॉफीच्या कपामध्ये लघवी, टीकेची झोड उठल्यानंतर माफी

(Pakistani Fisherman life changed got seventy two lakh rupees from one Crocker fish auction)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.